प्रत्येकजण झटतोय, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:18 PM2019-08-10T14:18:06+5:302019-08-10T14:18:16+5:30

शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील बराचचा भाग पाण्यामध्ये होता,

Electricity supply is maintained by electricity workers at risk of life | प्रत्येकजण झटतोय, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला 

प्रत्येकजण झटतोय, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला 

googlenewsNext

कोल्हापूर - कमरेएवढ्या पुराच्या पाण्यात घुसून कोल्हापूरातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील काही भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील बराचचा भाग पाण्यामध्ये होता, तरीदेखील महावितरणच्या उद्यमनगर शाखेतील वीज कर्मचाऱ्यांनी अर्ध्या पाण्यात शिरून हा वीज पुरवठा सुरळीत केला.

महावितरणच्या या शाखेचे अभियंता प्रशांत सासने आणि कर्मचारी अनिल काजवे , संदीप बच्चे, नामदेव ताते, सचिन ननुंद्रे, स्वाती मोटघरे,  सागर गावकरे, रोहित कदम या कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये काम करून या परिसरातील निम्मा भागातील वीज पुरवठा चालू करून दिला. हा वीज पुरवठा हा गेले ५ दिवसापासून बंद पडलेला होता. हा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी येथील स्थानीक नागरिक   जितू कातवरे, तानाजी कुंभार, कानवडे व इतर रहिवाशी यांचे सहकार्य लाभले.
 

Web Title: Electricity supply is maintained by electricity workers at risk of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.