सोने-चांदी व्यवहारात इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे
By admin | Published: March 25, 2015 12:38 AM2015-03-25T00:38:05+5:302015-03-25T00:40:04+5:30
पवार : एप्रिलपासून राज्यभर अंमलबजावणी
कोल्हापूर : सोने-चांदी तसेच मौल्यवान धातू व खडे यांच्या मोजमापातील अचूकपणासाठी व ग्राहकांना त्यांनी दिलेल्या मोबदल्यात योग्य वजनामध्ये मौल्यवान धातू मिळावेत, यासाठी एक एप्रिलपासून सर्व सोने-चांदी तसेच मौल्यवान धातू व खड्यांच्या मोजमापासाठी एक मिलीग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक काटे वापरणे बंधनकारक केल्याची माहिती सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र द. प्र. पवार यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण परिषदेच्या दिनांक ९ मार्च २०१५च्या बैठकीत सोने-चांदी व मौल्यवान धातू तसेच खडे यांच्या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे काही अशासकीय सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते. ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या या किमती वस्तू वजनामध्ये योग्य आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी धर्मकाटे बसवावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली होती. परंतु, वैधमापन
शास्त्र कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही तसेच शासनाद्वारे
धर्मकाटा बसवण्याबाबत कोणतीही योजना नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियमातील ‘नियम ४’ मध्ये सोने-चांदी तसेच मौल्यवान वस्तू व खडे यांच्या मोजमापासाठी केवळ ‘वर्ग अ’ व ‘वर्ग ब’प्रवर्गाच्या दांडीचा तराजू बुलियन वजने तसेच विशेष अचूकता (वर्ग १) व उच्च अचूकता असलेली (वर्ग २) ची अस्वयंचलित उपकरणे वापरण्याची तरतूद आहे. परंतु, या मोजमापामध्ये अधिक अचूकता यावी याकरिता नियंत्रक वैधमापन शास्त्र यांना असलेल्या विशेष अधिकारानुसार नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी एक मिलीग्रॅम अचूकतेची फक्त इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश काढलेले आहेत.
मौल्यवान धातू व खडे यांच्या मोजमापात अचूकता आल्याने ग्राहकांची फसवणूक नाही
यासंदर्भात ग्राहकांच्या काही तक्रारी व शंका असल्यास सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, यांच्याशी संपर्क साधावा