आजऱ्यात हत्ती-गव्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:45 PM2018-09-09T23:45:23+5:302018-09-09T23:45:26+5:30
कृष्णा सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : आजरा तालुक्यात यावर्षी मुसळधार पावसातच हत्ती आणि गव्यांचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीसदृश झालेल्या पावसातच हत्ती व गव्यांनी धुमाकुळीचा जोर धरल्याने तीन महिन्यांत अपरिमित असे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
तब्बल ३५ वर्षांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे. गवे वर्षानुवर्षे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकºयांचे कंबरडे मोडत आहेत. १३ वर्षांपूर्वी हत्तीचे आगमन होऊन हत्तीपासून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दशकात प्रथमच यंदा जून ते आॅगस्टअखेर सलग तीन महिने पावसाने धुमाकूळ घालून तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याबरोबर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात न येणारे गवे पावसातच पिकांची नासधूस करत आहेत. १३ वर्षांत पावसाळ्यात दर्शन न देणाºया हत्तीने यावर्षी मुसळधार पाावसात पिकांची धुलाई केली आहे.
पावसामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच हत्ती आणि गव्यांनीही धुमाकुळीचा जोर धरला. त्यामुळे पश्चिम भागातील मसोली, हाळोली, देवर्डे, वेळवट्टी, पेरणोली, कोरीवडे, गवसे, दाभिल, शेळप, आंबाडे, किटवडे, घाटकरवाडी आदी गावांत प्रामुख्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तीन महिन्यांत शेतकºयांचे पिकांचे नुकसान हत्ती व गव्यांनी केले आहे.
शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित
पश्चिम भागांतील विशेषत: मसोली, हाळोली, वेळवट्टी या परिसरात हत्तीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पेरणोली, देवर्डे, नावलकरवाडी, दाभिल, गवसे, आंबोड, किटवडे परिसरात गव्यापासून मोठे नुकसान झाले असताना अद्याप पंचनामा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.
नागरी वस्तीत सांबर
वेळवट्टीनजीक दोनवेळ सांबराचे दर्शन झाले. हत्ती, गव्यानंतर आता सांबरही नागरी वस्तीजवळ आले आहे. सांबर बिथरलेले किंवा जखमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने त्याची देखभाल करून पुन्हा जंगलात सोडण्याची मागणी होत आहे.