रंकाळा पदपथ उद्यानात हत्ती,गवा, पाणगेंडा, मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:32+5:302021-03-30T04:13:32+5:30

कोल्हापूर : रंकाळा पदपथ उद्यान, रंकाळा उद्यान येथे होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनातर्फे या ठिकाणी रोबोटिक थीम ...

Elephant, Goa, Pangenda, Crocodile in Rankala Footpath Park | रंकाळा पदपथ उद्यानात हत्ती,गवा, पाणगेंडा, मगर

रंकाळा पदपथ उद्यानात हत्ती,गवा, पाणगेंडा, मगर

googlenewsNext

कोल्हापूर : रंकाळा पदपथ उद्यान, रंकाळा उद्यान येथे होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनातर्फे या ठिकाणी रोबोटिक थीम साकारली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरच्या संस्कृतीबरोबरच हत्ती, गवा, पाणगेंडा,मगर याचे दर्शनाबरोबरत बालचमूचे मनोरंजनदेखील होणार आहे.

महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नांतून या दोन्ही उद्यानांत रोबोटिक थीम साकारली असून या प्रकल्पावर सुमारे दोन कोटी २४ लाख रुपये खर्च झाले आहेत. रंकाळा तलावात सायंकाळच्या वेळी मस्त नौकाविहारासह आता करमणुकीचे केंद्र व्हावे म्हणून दोन्ही उद्यानात जात्यावर दळप करणारी महिला, दूधकट्टा या सांस्कृतिक व्यक्तिरेखांबरोबरच कोल्हापूरचे एकेकाळचे वैभव असलेला हत्ती, कोल्हापूरची ओळख असलेला गवा, मगर व पाणगेंडा यांचे शिल्प साकारण्यात आले आहेत.

या शिल्परूपी प्राण्यांना सेन्सर बसविण्यात आले असून पर्यटक जेव्हा ते पाहायला पुढे जातील तेव्हा हत्ती डोकं, कान, डोळे हलवेल. पाणगेंडा आपला जबडा उघडेल. मगर शेपूट व डोळे हलवेल. त्यामुळे पर्यटकांचे क्षणभर मनोरंजन होणार आहे. आम्ही कोल्हापूर, गवा रेडा व मगर या शिल्पाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटदेखील साकारण्यात आलेला आहे. जात्यावर दळप करणाऱ्या महिलेसोबत अन्य कोणीही महिला फोटो घेऊ शकणार आहे. या रोबोटिक थीमसाठी ३३ लाख रुपये खर्च आला आहे.

रंकाळा परिसरात हरितपट्टे विकसित करण्याचा प्रयत्नदेखील महानगरपालिका करत आहे. इराणी खण ते खण विहार मंडळ व परताळे परिसरात हे हरितपट्टे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे.

रोबोटिक थीम पाहण्यासाठी खुली असून सार्वजनिक ठिकाणी साकारणारी पश्चिम महाराष्ट्रातील ती पहिलीच असल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन होणार आहे.

(फोटो देत आहे - रोबोटिक या नावाने पहावेत)

Web Title: Elephant, Goa, Pangenda, Crocodile in Rankala Footpath Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.