मनपाच्या चिखलात दादांचा हत्ती रुतणार

By Admin | Published: September 11, 2015 12:57 AM2015-09-11T00:57:52+5:302015-09-11T00:57:52+5:30

हसन मुश्रीफ यांची टीका : पालकमंत्र्यांना उपरोधिक भाषेत प्रत्युत्तर

The elephant's elephant will be trapped in the mammal's mud | मनपाच्या चिखलात दादांचा हत्ती रुतणार

मनपाच्या चिखलात दादांचा हत्ती रुतणार

googlenewsNext

कोल्हापूर : ‘हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौंके हजार’ असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणत आहेत. मात्र, हत्ती एकदा चिखलात रुतला की त्यास दहा क्रेन लावूनसुद्धा वर निघू शकत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत दादांची अवस्था चिखलात रुतलेल्या हत्तीसारखी होणार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसिद्धिपत्रकातून केली.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर ‘हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौंके हजार’ अशी उपरोधिक टीका केली होती. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. त्यास मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे, ‘पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक होत आहे. वीस कोटी रुपयांचा निधी दिल्याची फार टिमकी वाजवीत आहेत. आम्ही गेल्या पाच वर्षांत ११०० कोटी रुपये आणले.
अकरा महिन्यांपूर्वी त्यांनी हा विकासनिधी का आणला नाही? निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निधी खर्च होणार का, याबद्दल साशंकता आहे. तरीही शहरवासीयांची ते फसवणूक करीत आहेत. महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक स्वबळावर लढविली. जनसुराज्य व अपक्ष यांच्या पाठबळावर राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष बनला. दादा, गेल्या निवडणुकीत तुमची अवस्था काय झाली होती? या निवडणुकीत चांगली माणसे मिळणार नाहीत, म्हणून तुम्ही ‘ताराराणी आघाडी’ची साथ केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूर दौऱ्यामध्ये माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर केलेली टीका निषेधार्ह आहे. दानवे यांनी आपली पात्रता ओळखून पवारांवर टीका करायला हवी होती. आपल्या साखर कारखान्यासंबंधी पवार यांच्या घरी जाऊन दानवे यांनी भेट घेतल्याचे मी पाहिले आहे. दानवे यांनी आपल्या कारखान्यातील उसाला यंदा फक्त १२०० रुपये दर दिला आहे. शेतकऱ्यांची त्यांच्याबद्दलची मते वाईट आहेत. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी संयम राखणे अपेक्षित आहे.
दलाल, बाजारबुणगे
अनेक वर्षांपासून सोबत असलेला शिवसेना पक्ष तुम्ही नाकारला. आम्हाला उमेदवार शोधावे लागत नाहीत. आमच्याकडे चारित्र्यसंपन्न, गोरगरीब, सामान्य यांच्याबद्दल आस्था असणारे उमेदवार मोठ्या संख्येने आहेत. आम्ही दलाल, बाजारबुणग्यांना जवळ करीत नाही, असाही टोला मुश्रीफ यांनी ताराराणी आघाडीचे नाव न घेता पत्रकात लगावला आहे.

Web Title: The elephant's elephant will be trapped in the mammal's mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.