पेरणोलीत गव्यांचा अन् माद्याळात हत्तींचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:40 PM2017-08-03T15:40:30+5:302017-08-03T15:51:35+5:30

पेरणोली :पेरणोली (ता. आजरा) येथे गव्यांनी धुमाकूळ घालून भात रो लागण, ऊस, भुईमूगाचे नुकसान केले तर देवर्डेपैकी माद्याळ येथे हत्तीने धुमाकूळ घालून कुपनलिकेच्या विद्युतपेठीची मोडतोड करून भातरोप लागणीचे सुमारे ५० हजाराचे नुकसान केले.

Elephants smoke in the paraololite orchards | पेरणोलीत गव्यांचा अन् माद्याळात हत्तींचा धुमाकूळ

पेरणोलीत गव्यांचा अन् माद्याळात हत्तींचा धुमाकूळ

Next
ठळक मुद्देकुपनलिकेच्या विद्युत पंपाची मोडतोडहत्तीचा चार दिवसापासून धुमाकूळभात रोप लागण व ऊसाचे ५० हजारोपक्षा अधिक रकमेचे नुकसानगव्यांचा कळप ऐन पावसाळ्यात वनविभागाची हुलकावणी, शेतकरी हवालदिल


पेरणोली :पेरणोली (ता. आजरा) येथे गव्यांनी धुमाकूळ घालून भात रो लागण, ऊस, भुईमूगाचे नुकसान केले तर देवर्डेपैकी माद्याळ येथे हत्तीने धुमाकूळ घालून कुपनलिकेच्या विद्युतपेठीची मोडतोड करून भातरोप लागणीचे सुमारे ५० हजाराचे नुकसान केले.


पेरणोली येथे निवृत्ती फगरे, भरत सावंत, बायाक्का सावंत, संजय लोंढे, निवृत्ती लोंढे आदी शेतकºयांचे टेक, एकूलओपा, विठोबाची पटी या शेतामधील ऊस, भुईमूग, भातरोप लागणीचे नुकसान केले आहे. गव्यांचा कळप ऐन पावसाळ्यात धुमाकूळ घालत असल्याने शेतकºयांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


माद्याळ (ता. आजरा) येथे गेले चार दिवसापासून हत्ती धुमाकूळ घालत असून कुपनलिकेची मोडतोड, भात रोप लागण व ऊसाचे सुमारे ५० हजारोपक्षा अधिक रकमेचे नुकसान केले आहे. येथील गावाशेजारील शेतामधील सुरेश शेळके, शिवाजी शेळके, हणमंत शेळके, महादेव शेळके, कृष्णा शेळके, दीपक जाधव आदी शेतकºयांचे नुकसान केले आहे.


तालुक्यामध्ये वनविभागाला हुलकावणी देवूनही हत्ती व गव्यांचा कळप नुकसानीचे सत्र सुरूच ठेवत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Web Title: Elephants smoke in the paraololite orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.