शहरात अकरावीची केंद्रीय, तर ग्रामीणमध्ये महाविद्यालय पातळीवर प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:29+5:302021-08-12T04:29:29+5:30

कोल्हापूर : सीईटी परीक्षा रद्द झाल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार आता कोल्हापूर शहर, गडहिंग्लज शहरामध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय, तर ...

Eleven central admission process in urban areas and college level in rural areas | शहरात अकरावीची केंद्रीय, तर ग्रामीणमध्ये महाविद्यालय पातळीवर प्रवेश प्रक्रिया

शहरात अकरावीची केंद्रीय, तर ग्रामीणमध्ये महाविद्यालय पातळीवर प्रवेश प्रक्रिया

Next

कोल्हापूर : सीईटी परीक्षा रद्द झाल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार आता कोल्हापूर शहर, गडहिंग्लज शहरामध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय, तर ग्रामीण भागामध्ये महाविद्यालयांच्या पातळीवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील एकूण ५५०८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर शहरातील ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी सन २००८-०९ पासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही परीक्षा झाल्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, आता सीईटी रद्दचा मंगळवारी निर्णय झाल्याने आणि राज्य शासनाने गेल्यावर्षीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर आणि गडहिंग्लज शहरात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया होईल. अन्य बारा तालुक्यांमध्ये तेथील महाविद्यालयांच्या पातळीवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

विद्यार्थी काय म्हणतात?

परीक्षा रद्द झाल्याने आठवी, नववीतील अंतिम आणि दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे मूल्यमापनाद्वारे आमचा निकाल जाहीर झाला. ‘सीईटी’द्वारे आम्हाला गुणवत्ता सिद्ध करता येणार होती. या परीक्षेसाठी केलेली आमची तयारी वाया गेली आहे.

-स्नेहल रोहिदास, सुभाषनगर

शासनाच्या सूचनेनुसार सीईटीचा अर्ज भरला. अभ्यासही सुरू केला. दहा दिवसांवर सीईटी आलेली असताना ती रद्द झाली. दहावीच्या अंतिम परीक्षेप्रमाणे स्थिती झाली. अभ्यास करूनही परीक्षा होणार नसल्याने वाईट वाटत आहे.

-आर्यन गायकवाड, फिरंगाई तालीम परिसर शिवाजीपेठ

आकडेवारी दृष्टिक्षेपात

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ५५०८८

जिल्ह्यातील महाविद्यालये : १५०

अकरावी प्रवेशाच्या जिल्ह्यातील जागा : ३५०००

शहरातील महाविद्यालये : ३५

अकरावी प्रवेशाच्या शहरातील जागा : १४६८०

कला (इंग्रजी) : १२०

कला (मराठी) : ३६००

वाणिज्य (इंग्रजी) : १६००

वाणिज्य (मराठी) : ३३६०

विज्ञान : ६०००

टक्केवारीनिहाय दहावी उत्तीर्ण विद्यार्थी

७५ टक्क्यांवरील : २४९१९

६० टक्क्यांवरील :२११२२

४५ टक्क्यांवरील : ८६१७

३५ टक्क्यांवरील : ४३०

प्रतिक्रिया

शासन आदेशानुसार कोल्हापूर शहरातील विविध ३५ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीची प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येईल.

-सुभाष चौगुले, सहायक शिक्षण संचालक

Web Title: Eleven central admission process in urban areas and college level in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.