जिल्ह्यात अकरा बंधारे पाण्याखाली, गगनबावड्यासह आजरा, शाहूवाडीत पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:40 PM2020-07-17T17:40:36+5:302020-07-17T17:46:13+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

Eleven dams in the district are under water | जिल्ह्यात अकरा बंधारे पाण्याखाली, गगनबावड्यासह आजरा, शाहूवाडीत पावसाचा जोर

जिल्ह्यात अकरा बंधारे पाण्याखाली, गगनबावड्यासह आजरा, शाहूवाडीत पावसाचा जोर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात अकरा बंधारे पाण्याखालीगगनबावड्यासह आजरा, शाहूवाडीत पावसाचा जोर

कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच राहिली. गगनबावडा, आजरा , शाहूवाडीत पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असून वीजनिर्मितीसाठी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर आहे. गुरुवारी दुपारनंतर पावसाने काहीसी विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच राहिली. दिवसभर एकसारखा पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील पाऊस समाधानकारक आहे. गगनबावडा तालुक्‍यात अतिवृष्टी तर राधानगरी शाहूवाडी, आजरा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

धरण क्षेत्रात ही चांगला पाऊस सुरू असून राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद १४५०, दूधगंगेतून ११००, कासारीतून २५०, कडवीतून १५० तर पाटगाव मधून ३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी वाढत असून अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस ८४ मिलिमीटर इतका नोंद झाली.

धरणातील पाणीसाठा घनफुट मध्ये असा, कंसात क्षमता -

राधानगरी ः ५.११ (८.३६१), तुळशी ः १.८० (३.४७१), वारणा ः १९.५२ (३४.३९९), दूधगंगा ः १५.६७ (२५.३९३), कासारी ः १.५५ (२.७७४), कडवी ः १.३० (२.५१६), कुंभी ः १.६१ (२.७१५), पाटगाव ः २.४४ (३.७१६).

Web Title: Eleven dams in the district are under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.