लघुचित्रपट उत्सवात अकरा राज्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:13+5:302021-08-24T04:29:13+5:30
संस्कृत भाषा आधुनिक आकर्षक पद्धतीने सर्व लोकांपर्यंत पोचविली पाहिजे. त्यासाठी लघुचित्रपट उत्सव सारखे उपक्रम लाभदायक ठरतील. देशातील विविध भागातील ...
संस्कृत भाषा आधुनिक आकर्षक पद्धतीने सर्व लोकांपर्यंत पोचविली पाहिजे. त्यासाठी लघुचित्रपट उत्सव सारखे उपक्रम लाभदायक ठरतील. देशातील विविध भागातील तरुण यात सहभागी झाले, हे संस्कृत भाषेच्या भाग्योदयाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी यावेळी केले. संस्कृत ही मनोरंजनाची भाषा दीर्घकाळापासून आहे. म्हणूनच उत्तम अशी नाटके संस्कृतमधून लिहिली गेली. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा उत्सव सर्व जगभर प्रसारित करण्यात येत आहे. संस्कृत भाषेला लोकप्रिय करण्याचे हे आव्हान आजच्या युवकांनी स्वीकारले पाहिजे, असे आवाहन संस्कृत भारतीचे प्रचारप्रमुख शिरीष भेडसगावकर यांनी केले. या सर्व लघुचित्रपटात आजच्या काळातील समस्या मांडल्या आहेत. यूट्यूबवर ( https://www.youtube.com/watch?v=bnic2q-88bU) हा उत्सव पाहता येईल, असे त्यांनी सांगितले.
‘थांगता’ तर्फे पर्यावरणाचे रक्षाबंधन
कोल्हापूर : येथील इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनने आगळावेगळे रक्षाबंधन केले. कोल्हापूर शहर, उंचगाव, चिंचवड, गांधीनगर, वळीवडे येथे असोसिएशनच्या मुला-मुलींनी विविध झाडे, रोपांना ओवाळून राखी बांधली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात असोसिएशनचे सचिव सतीश वडणगेकर, प्रशिक्षिका मेघना परीट, वसही कवले, श्रद्धा परीट, तेजस्विनी सुतार, प्रियंका पाटील, आराध्या सलगर, सिद्धी चौगुले, देवकी पाटील, रूद्र परीट, आर्यन पाटील, अजिंक्य सलगर, सोहम पाटील, अथर्व बागी, सर्वेश चौगुले, शौर्य पाटील सहभागी झाले.
कमल कटारिया यांचा सत्कार
कोल्हापूर : कोरोना काळातील सेवेबद्दल कोल्हापूर विमानतळाला लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. याबद्दल विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांचा सोमवारी ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष बळीराम वराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी रवी पोतदार, अमित चौकले उपस्थित होते. विमानतळावर होणाऱ्या नाईट लँडिंग, पार्किंग हँगर, नवीन टर्मिनल बिल्डिंग, आदींची माहिती कटारिया यांनी दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.