अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे अकरा विद्यार्थी जीपॅट परीक्षेत यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:10+5:302021-04-11T04:24:10+5:30

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कॉलेजच्यावतीने अद्ययावत शिक्षण देण्याची व्यवस्था कायमच करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रम व त्यांना मिळालेले ...

Eleven students of Ashokrao Mane Pharmacy College passed the GPAT exam | अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे अकरा विद्यार्थी जीपॅट परीक्षेत यशस्वी

अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे अकरा विद्यार्थी जीपॅट परीक्षेत यशस्वी

Next

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कॉलेजच्यावतीने अद्ययावत शिक्षण देण्याची व्यवस्था कायमच करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रम व त्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले आहे. यापुढेही गुणवत्तावाढीसाठी अग्रभागी राहणार असल्याची महिती संस्थाध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निखिल माने, राजेंद्र मालेगावे, ऋतुजा बुगड, कोमल पवार, व्यंकटेश मुंडे, प्रदीप गावेकर, विजया गोवंदे, प्रेरणा तेली, श्रुती कुलकर्णी, जस्मिन नायकवडी, शुभांगी चौगुले तसेच सावे येथील अशोकराव माने इन्स्टिट्युट ऑफ फर्मास्युटिकल सायन्स ॲण्ड रिसर्च कॉलेजचा विद्यार्थी कौस्तुभ सुतार याचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था अध्यक्ष विजयसिंह माने, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.ए.एस.कुलकर्णी, डॉ.एस.एम.गेंजगे, प्रा.पी.बी.पाटील, प्रा.एस.ए.बंडगर उपस्थित होते.

फोटो ओळी-पेठ वडगाव येथील अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एस.व्ही.पाटील, ए.एस.कुलकर्णी, एस.एम.गेंजगे, पी.बी.पाटील, एस.ए.बंडगर उपस्थित होते.

Web Title: Eleven students of Ashokrao Mane Pharmacy College passed the GPAT exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.