‘अकरावी विज्ञान’च्या विद्यार्थ्यांना आज मिळणार करिअरचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:11+5:302020-12-25T04:19:11+5:30
कोल्हापूर : इयत्ता अकरावी विज्ञान (सायन्स) शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शाखेतील यशस्वी करिअरचा मंत्र आज, शुक्रवारी मिळणार आहे. ...
कोल्हापूर : इयत्ता अकरावी विज्ञान (सायन्स) शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शाखेतील यशस्वी करिअरचा मंत्र आज, शुक्रवारी मिळणार आहे. त्यासाठी ‘लोकमत’ आणि ओम सायन्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान शाखेतील यशस्वी करिअर’ हा सेमिनार आयोजित केला आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड या प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध समुपदेशक प्रा. शशिकांत कापसे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये मुलांच्या स्वत:च्या भवितव्यावर आणि पालकांच्या नेमक्या भूमिकेवर मार्गदर्शन केले जाणार आहे. बारावी सायन्समध्ये टक्केवारी घसरण्याची कारणे आणि उपाय, मुलांचा आत्मविश्वास, अभ्यासातील एकाग्रता, पालकांनी काय करावे, तुम्हीच व्हा मुलांचे रोड मॉडेल या मुद्यांवर प्रा. शशिकांत कापसे मार्गदर्शन करणार आहेत. अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन हा सेमिनार आयोजित केला आहे. त्यामध्ये निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होऊन त्यांना यशाचा मंत्र मिळणार आहे.
चौकट
दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोरोनामुळे यंदा दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा दरवर्षीप्रमाणे झाला नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने ‘लोकमत’ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार या सेमिनारमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक आणि मित्रमंडळींना हा सोहळा घरबसल्या ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरून (https://www.facebook.com/lokmatevent) लाईव्ह पाहता येईल. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी विद्यार्थी, पालकांनी (८६६८७४९०८०/९५४५७२९५९५) या क्रमांकावर संपर्क साधावा.
फोटो (२४१२२०२०-कोल-जयश्री गायकवाड (सेमिनार)
फोटो (२४१२२०२०-कोल-लोकमत सेमिनार)