वाघजाई डोंगर वाचवण्यासाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:10+5:302021-09-02T04:50:10+5:30
कोपार्डे : वाघजाई डोंगराचा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जोपासण्यासाठी करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी रविवारी वाघजाई ...
कोपार्डे : वाघजाई डोंगराचा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जोपासण्यासाठी करवीर व पन्हाळा तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी रविवारी वाघजाई डोंगरावर एकत्र येणार असून, येथूनच आंदोलनाचा एल्गार पुकारला जाणार असल्याचे करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी जाहीर केले. बुधवारी अरुण निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोपार्डे (ता. करवीर) येथे शेतकऱ्यांची बैठक झाली. या वेळी राजेंद्र सूर्यवंशी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. या वेळी सूर्यवंशी म्हणाले, डोंगरावर सपाटीकरण केल्याने पावसाळ्यात डोंगराची नैसर्गिक ठेवण ठिसूळ होणार आहे. ढगफुटीसदृश पाऊस झाला तर, डोंगर शेजारच्या गावावर येणार असून माळीणसारखी घटना घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
चौकट : गवतावर मारले तणनाशक
सांगरूळ धरण संस्थेचे उपाध्यक्ष बंडा पाटील म्हणाले, गेली १५० वर्षे डोंगरावरील जमिनीत आमची वहिवाट व सातबारा उतारे आहेत. वर्षातील आठ महिने या डोंंगरावरील चारा आम्हाला जनावरांसाठी उपलब्ध होतो. पण ज्यांनी या जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यांनी डोंगरावर चर मारून डोंगर फोडला आहे. काही खरेदीदारांनी तर डोंगरावरील गवतावर तणनाशक मारून त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला. गेली तीन दिवस लोकमतने वाघजाई डोंगराच्या सद्यस्थितीवर वृत्तमालिका प्रसिद्ध करून शेतकऱ्यांची व्यथा मांडल्याबद्दल अरुण निंबाळकर यांनी लोकमतचे आभार मानले.
010921\20210901_124502.jpg
वाघजाई डोंगर बचावासाठी कोपार्डे ता. करवीर येथे अरुण निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राजेंद्र सुर्यवंशी, बंडा पाटील भगवान पाटील ज्योतीराम पाटील