मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर पवार नाराज,‘एल्गार’चा तपास ‘एनआय’एकडे अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:37 PM2020-02-14T13:37:33+5:302020-02-14T15:53:52+5:30
पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआरए’कडे देण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी यासदंर्भात पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूर : पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआरए’कडे देण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी यासदंर्भात पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
भीमा कोरेगांव दंगल आणि त्यानंतर झालेल्या एल्गार परिषदेच्या तपासाबाबत मागील सरकारच्या गृहखात्यातील अधिकाऱ्यांची बाजू आक्षेपार्ह, चुकीची होती अशा तक्रारी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. ज्यांची वागणुक आक्षेपार्ह आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याची प्रक्रिया येथून सुरु झाली होती. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार असून तो काढून घेणे योग्य नाही. केंद्राने तो काढून घेतला म्हणून त्याला पाठींबा देणेही अधिक योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले.
भाजपच्या विरोधात जनमत
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत ही भाजपला दणका बसला, ही देशातील परिवर्तनाची सुरवात आहे का असे विचारता पवार यांनी सांगितले, महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आता दिल्लीत भाजप सत्तेपासून दूर गेले. परंतू प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवेगळी आहे. तरीही भाजपच्या विरोधात अनुकुल वातावरण असल्याचे दिसत नाही. निश्चितपणे भाजपच्या विरोधात जनमत आहे.
राज्यातील तीन पक्षाचे सरकार आलबेल
राज्यातील तीन पक्षाचे सरकार एकत्रितपणे काम करत, काय करायचे आहे ते एकत्रपणे ठरवत आहेत. त्यामुळे सगळेच आलबेल आहे असे म्हणायला हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले.