आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटी दूर करा : समरजित घाटगे : जिल्हाधिकाऱ्यांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:06+5:302021-03-06T04:24:06+5:30
कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून रेंगाळलेल्या आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे. पुनर्वसन न झाल्याने या कामाला ...
कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून रेंगाळलेल्या आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे. पुनर्वसन न झाल्याने या कामाला धरणग्रस्तांकडून विरोध होत आहे. तरी यातील त्रुटी दूर करून पुनर्वसनाचे काम मार्चअखेर पूर्ण व्हावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
ते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात २२७ कोटींचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून आणला होता. मात्र इतका मोठा निधी आणून सुद्धा हे काम अपुरे आहे. धरणग्रस्तांना विश्वासात न घेतल्याने घळ भरणीच्या कामास ते विरोध करीत आहेत. एकदा धरणात पाणीसाठा झाला की आपला पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार नाही, अशी त्यांना भीती आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला की ते स्वत: घळ भरणीच्या कामासाठी सहकार्य करतील.
---
शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल
या धरणात पाणीसाठा व्हावा, ते पाणी आपल्या शिवारात खेळावे. असे स्वप्न हे शेतकरी कित्येक वर्षे पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जमिनी विस्थापित धरणग्रस्तांसाठी दिल्या आहेत. पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते, तर घळ भरणीच्या कामाला विरोध झाला नसता. शिवाय या धरणात पाणी साठवण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले असते, असेही घाटगे म्हणाले.
---
फोटो नं ०५०३२०२१-कोल-आंबेओहोळ निवेदन
छायाचित्र- आंबेओहोळ धरण परिसरातील पुनर्वसन व घळ भरणीच्या कामासंदर्भात शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली.
--