नेसरी वाचन मंदिरातर्फे वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:22+5:302021-07-19T04:16:22+5:30

येथील नेसरी वाचन मंदिरतर्फे कै. अमित मांजरेकर बाल संस्कार केंद्रांतर्गत ' कै.अमित मांजरेकर ' यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा ...

Eloquence competition by Nesri Reading Temple | नेसरी वाचन मंदिरातर्फे वक्तृत्व स्पर्धा

नेसरी वाचन मंदिरातर्फे वक्तृत्व स्पर्धा

Next

येथील नेसरी वाचन मंदिरतर्फे कै. अमित मांजरेकर बाल संस्कार केंद्रांतर्गत ' कै.अमित मांजरेकर ' यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

इयत्ता ३ री ते सहावी व इयत्ता ७ वी ते नववी अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. यावेळी अनुक्रमे अडीच व ३ मिनिटाचा वेळ असून स्पर्धकाने आरंभी पूर्ण नांव-गाव-इयत्ता व शाळेचा उल्लेख करावा. आपले भाषण टेलिग्रामवर ९९२३५६६७७१ व ८००७७६९१२९ वर २७ जुलैपर्यंत पाठवावे.

दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीत्र देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेकरिता विषय : कर्तव्यदक्ष कोरोना योद्धे, ऑनलाईन शिक्षण - फायदे व तोटे, ‘माझे कुटुंब माझी : जबाबदारी’, ‘निसर्ग रक्षण हेच आपले संरक्षण’, ‘ग्रंथालये ज्ञानाची कवाडे’.

अधिकाधिक शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यवाह वसंतराव पाटील यांनी केले आहे.

Web Title: Eloquence competition by Nesri Reading Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.