मुगळी येथील सेवासंस्थेत १४लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:00 AM2020-05-31T11:00:57+5:302020-05-31T11:02:15+5:30

कर्जावरील व्याज न घेणे , सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून , मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे . संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक केली आहे .

Embezzlement of Rs | मुगळी येथील सेवासंस्थेत १४लाखांचा अपहार

मुगळी येथील सेवासंस्थेत १४लाखांचा अपहार

Next
ठळक मुद्देअडकूर परिसरात आणखी काही सेवा संस्थेमध्थे ही अशाच प्रकारे  अपहार झाल्याची चर्चा आहेअध्यक्ष, बँक निरिक्षकासह १५जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल  

चंदगड :-- मुगळी ( ता . चंदगड ) येथील रवळनाथ सेवा संस्थेत १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १४ लाख ३६ हजार ७ रुपयांचा अपहार झाला आहे .याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक निसार शेरखान यांनी चंदगड पोलिसात दिली आहे . विद्यमान अध्यक्ष,उपााध्यक्ष, संचालक , संचलिका , बँक निरिक्षक , बँक शाखाधिकारी अशा एकूण १५ जणां विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .

यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी - मुगळी ( ता . चंदगड ) येथील रवळनाथ सेवा संस्थेतील सभासदांना बोगस मेंबर कर्ज , खावटी कर्ज , कर्जावील व्याज न घेता बंद केलेली रक्कम , सभासदांच्या ठेवीची रक्कम सभासदांच्या सह्या न घेता उचल , खर्चाचे बिल व्हौचर्स न घेता इतर खर्चावरील रकमा अशी एकूण १४ लाख ३६ हजार ७ रुपये संस्था रोजकिर्दीच्या जमा रकमेच्या हात शिल्लकेतून बँक चालू खातेस प्रत्यक्ष भरणा न करता फक्त किर्दीला पोकळ जमा खर्च केलेला आहे .

तथापि त्यांचे भरणा काँन्टर तपासणीला उपलब्ध न झाल्यामुळे बँकेचा खाते ऊतारा मागवून वेळ घेतले असता सदर बँक चालू खातेस खर्ची पडललेल्या रकमा बँक खात्यास भरणा केलेचे दिसून येत नाहीत . कर्जावरील व्याज न घेणे , सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून , मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे . संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक केली आहे .

संस्था निधीचा गैरवापर व अपहार केला आहे . १६ जुलै २०१ ९ ते १ ९ आक्टोबर २०१ ९ च्या लेखापरिक्षण तपासणीमध्ये संशयित १ ते १५ यांनी संगनमताने १४ लाख ३६ हजार ७ रुपयांचा अहपार करुन सभासदांची फसवणुक केली आहे . अध्यक्ष गणपती राणबा कलागते , उपाध्यक्ष जयवंत मल्लाप्पा पाटील , संचालक कान्होबा गोपाळ शिवनगेकर , कैतान बाळकु फर्नांडीस , मारुती धाकु शिप्पुरकर , बाबु बाळु रेडेकर , दशरथ जोतिबा मुरुडकर , यल्लापा धोडींबा कांबळे , सौ . प्रेमा मोहन रेडेकर , सौ . सुधा नारायण करगोनावर , सचिव कल्लापा राणबा कांबळे ( सर्व रा . मुगळी , ता . चंदगड ) ,जिल्हा बॅँ क शाखा अडकुरचे निरिक्षक दादु हसन मुल्ला ( रा . गडहिंग्लज ) , अडकूर शाखेचे शाखाधिकारी पुरुषोत्तम मातोंडकर ( रा . यशवंतनगर , चंदगड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो . हे . काँ . श्री . नांगरे तपास करत आहेत .

 

Web Title: Embezzlement of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.