जनता बझारमध्ये सव्वाबारा लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 06:20 PM2020-06-10T18:20:59+5:302020-06-10T18:25:51+5:30

जनता बझारमध्ये (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझुमर्स लिमिटेड) १२ लाख २४ हजारांचा अपहार झाल्याचा प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला.

Embezzlement of Rs 12 lakh in Janata Bazaar revealed in audit: Police | जनता बझारमध्ये सव्वाबारा लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड

जनता बझारमध्ये सव्वाबारा लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड

googlenewsNext
ठळक मुद्दे जनता बझारमध्ये सव्वाबारा लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड चेअरमन उदय पोवारसह चौघांवर पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : जनता बझारमध्ये (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझुमर्स लिमिटेड) १२ लाख २४ हजारांचा अपहार झाल्याचा प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला.

या प्रकरणी माजी उपमहापौर व जनता बझारचे चेअरमन उदय ऊर्फ उद्धव पोवार यांच्यासह पाचजणांवर मंगळवारी (दि. ९) रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये संचालकांसह व्यवस्थापकाचाही समावेश आहे. हा अपहाराचा प्रकार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात घडला.

पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संचालक-अध्यक्ष उदय ऊर्फ उद्धव राजाराम पोवार (रा. शुक्रवार पेठ), डिझेल विभागप्रमुख सूर्यकांत रामचंद्र दीक्षित (रा. १९५९, डी वॉर्ड, रविवार पेठ), संचालक मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक श्रीकांत गोविंद देवेकर (रा. ए विंग्ज, चौथा मजला, राजाराम पार्क, संभाजीनगर), पांडुरंग बापूसाहेब पाटील (रा. ४३३, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) यांचा समावेश आहे.

 

Web Title: Embezzlement of Rs 12 lakh in Janata Bazaar revealed in audit: Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.