एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:52+5:302021-03-13T04:43:52+5:30

जयसिंगपूर : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने १४ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण सुरू केले आहे. ...

Embezzlement of students by postponing MPSC exams | एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण

Next

जयसिंगपूर : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने १४ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण सुरू केले आहे. हा निर्णय त्वरित मागे घेऊन राज्य सरकारने तातडीने परीक्षा घ्यावी, अन्यथा सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.

मंत्र्यांचे दौरे होत आहेत. विधानसभेचे कामकाज झाले आहे. बाकीच्या परीक्षा होत आहेत. ठराविक भागातच कोरोना वाढत आहे. मग किती वेळा परीक्षा पुढे ढकलणार, कोरोनाचा बाऊ करून सरकारने विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये. विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे. सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणे बंद करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला.

कोट - राज्य सरकार तसेच एमपीएससी बोर्डाने चार वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Web Title: Embezzlement of students by postponing MPSC exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.