खरीप हंगामात आपत्कालीन पीक नियोजन आराखडा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:02 PM2020-05-08T16:02:58+5:302020-05-08T16:05:44+5:30
आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला असून त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
कोल्हापूर : आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला असून त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
या आराखड्यानुसार खरीपातील जिरायत पिकांसाठी जूनचा पहिला ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नागलीचा पेरणी कालावधी, जूनचा पहिला ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा सर्वसाधारण पेरणी कालावधी तर जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा भुईमूग पेरणीचा सर्वसाधारण कालावधी निश्चित केला आहे.
बागायत पिकांसाठी मे चौथा ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा त जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा पेरणी कालावधी आणि मेचा तिसरा ते जूनचा पहिला आठवडा भातासाठी पेरणी कालावधी निश्चित केला आहे.
सोयाबीन पिकाची सर्वसाधारण उगवण क्षमता ही 70 टक्के गृहित धरून प्रति एकरी 30 किलो बियाणे प्रमाण असते. तथापि बियाणे संचालकांच्या सूचनेनुसार सोयाबीन पिकाची उगवण क्षमता ही 65 टक्के गृहित धरून प्रति एकरी बियाणे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे.