दिव्यांगांच्या गरजा ओळखून योजना राबविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:09+5:302021-08-28T04:29:09+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या गरजा विचारात घेऊन योजना राबविण्यावर भर देण्यात येईल, ...

Emphasis on implementation of the scheme by identifying the needs of the disabled | दिव्यांगांच्या गरजा ओळखून योजना राबविण्यावर भर

दिव्यांगांच्या गरजा ओळखून योजना राबविण्यावर भर

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या गरजा विचारात घेऊन योजना राबविण्यावर भर देण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

दिव्यांगांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार जिल्हा परिषदेकडील प्राप्त निधीतून वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हयातील विविध दिव्यांग संघटनांसोबत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य अपंग संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील २० हून अधिक दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सन २०२१-२२ या वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीतून दिव्यांगाकरिता विविध योजना घेण्यात आल्या आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

चौकट

नियोजित योजना

१ अंध लाभार्थ्यांना ब्रेल लिपी शिकण्यासाठी ब्रेल वर्ग व वाचनालय सुरू करणे

२ मूकबधिर मुलांना बेरा तपासणी करण्यासाठी सानुग्रह अनुदान देणे, स्पीच थेरपी वर्ग घेण्यासाठी नियोजन करणे, ३ दिव्यांग लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यासाठी लागणारी वयोमर्यादेची अट शिथिल करून विशेष शिबिराचे आयोजन करणे

४ स्वमग्नता असलेल्या मुलांसाठी विशेष वर्गाचे नियोजन करणे

५ अस्थिव्यंग दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम साधने पुरविण्याच्या दृष्टीने कॅलिबर, व्हीलचेअर दुरुस्तीसाठी वर्कशॉप सुरू करणे तसेच दिव्यांगांच्या पालकांना फिजिओथेरपीचे प्रशिक्षण देणे

६ दिव्यांग बचत गटांची स्थापना करुन त्यांना विविध व्यवसायासाठी अनुदान देणे, कौशल्य विकास अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे

७ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगांच्या स्वतंत्र नोंदी ठेवणे

८ दिव्यांग व्यक्तींकरिता जिल्हा स्तरावर दिव्यांग कक्षाची स्थापना करणे

Web Title: Emphasis on implementation of the scheme by identifying the needs of the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.