आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या: सीमा कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 02:39 PM2019-12-02T14:39:42+5:302019-12-02T14:41:39+5:30
नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या, असे आवाहन दलित इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) वुमन विंगच्या प्रमुख सीमा कांबळे यांनी येथे केले.
कोल्हापूर : नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या, असे आवाहन दलित इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) वुमन विंगच्या प्रमुख सीमा कांबळे यांनी येथे केले.
येथील शिवाजी पार्कमधील एका हॉटेलमध्ये ‘डिक्की’तर्फे अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील उद्योजक, नवउद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी ‘डिक्की’चे पुणे विभागाचे अध्यक्ष अनिल होवाळे प्रमुख उपस्थित होते. सीमा कांबळे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या स्टँडअप इंडिया योजनेचा लाभ घेऊन उद्योजकांनी कार्यरत राहावे. त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्यासह आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे.
अनिल होवाळे यांनी डिक्की सहयोग योजना, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (पीएसयू) आणि आरक्षणाची सवलत, आदींची माहिती दिली. ‘डिक्की’चे राज्य उपाध्यक्ष आदिकराव सदामते यांनी मार्गदर्शन केले. नवेदिता कांबळे यांनी स्टँडअप इंडिया योजनेची माहिती दिली.
या कार्यक्रमात ‘डिक्की’चे वेस्टर्न इंडिया उपाध्यक्ष अविनाश जगताप, सांगलीचे समन्वयक दिलीप देशमुख, आदित्य वाघ, राजेंद्र चौगुले, राजेंद्र कांबळे, अनिल कामत, उदय लोखंडे, अक्षय पाटोळे, नामदेव बागी, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील उद्योजक उपस्थित होते. कोल्हापूरचे समन्वयक संजय वाघ यांनी प्रास्ताविक केले. वुमेन विंगच्या कोल्हापूर समन्वयक संगीता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
जनजागृतीसाठी तालुकानिहाय मेळावे
‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या प्रयत्नांतून फँ्रचाईजी केंद्र सरकारने स्टँड अप इंडियाला जोडली आहे. एस.सी., एस.टी. प्रवर्गातील उद्योजकांमध्ये जनजागृतीसाठी तालुकानिहाय मेळावे घेतले जाणार आहेत, असे कोल्हापूरचे समन्वयक संजय वाघ यांनी सांगितले.