कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणीवा जोपासाव्यात : लवटे
By admin | Published: May 2, 2017 06:17 PM2017-05-02T18:17:42+5:302017-05-02T18:17:42+5:30
कोल्हापूरात ‘गोकुळ’च्यावतीने कामगार दिन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0२ :कामगारांनी आपल्या हक्कांच्या जाणिवेबरोबरच सामाजिक जाणीवाही जोपासल्या पाहिजेत. ‘गोकुळ’चे कर्मचारी सामाजिक कामात आघाडीवर असल्याचे प्रतिपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. बालसंकुलातील अनाथ मुलांना ‘गोकुळ’ने केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख करीत वंचित मुलांना लागणाऱ्या दुधाची तहान भागवून संघाने मातृत्वाची भूमिका बजावल्याचे डॉ. लवटे यांनी सांगितले.
डॉ. लवटे यांच्या हस्ते लालबावटा संघटनेचे ध्वजारोहण करण्यात आले. संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शाह, तसेच हिमांशू कापडिया, अनिल चौधरी, आनंदा स्वामी, प्रशासन अधिकारी डी. के. पाटील, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, सुरक्षा अधिकारी कदम, संघटनेचे जनरल सेके्रटरी संजय सदलगेकर, कार्यकारिणी सदस्य शंकर पाटील, मल्हार पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, अजय पोवार, प्रकाश आडनाईक, डॉ. प्रकाश दळवी, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते. संघटनेचे सचिव सदाशिव निकम यांनी आभार मानले.