विद्या प्रबोधिनीतर्फे रोजगार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:56+5:302021-07-01T04:17:56+5:30
कोल्हापूर : माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केलेल्या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत सीएनसी, व्हीएमसी ...
कोल्हापूर : माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केलेल्या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत सीएनसी, व्हीएमसी ऑपरेटिंग प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्योग जगतामध्ये आवश्यक असणारी औद्योगिक सुरक्षा, ड्रॉइंगचे वाचन (प्राथमिक), मेजरिंग इन्स्ट्रृमेंटचा वापर, जॉब चेकिंग, प्रत्यक्ष कामाचा अनुभव ही कौशल्ये शिकविण्यात येतील. याासाठी शैक्षणिक अट नसून, वयोमर्यादा १८ ते ३५ आहे. प्रशिक्षण तीन आठवड्यांचे व रोज दोन तास असेल. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी ६ जुलैपर्यंत विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांचे संपर्क कार्यालय, जरगनगर कमानीजवळ येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत नोंदणी करता येणार आहे. २७ जून ते ६ जुलै २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी १.३० व दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये सुरू आहे.