यमगेच्या युवकाच्या पंखांना हवे मदतीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:38 AM2017-12-04T00:38:24+5:302017-12-04T00:39:41+5:30

Empowering Wings of Yameg's Young Wings | यमगेच्या युवकाच्या पंखांना हवे मदतीचे बळ

यमगेच्या युवकाच्या पंखांना हवे मदतीचे बळ

Next

अनिल पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : दुसºयाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाºया एका तरुणाने अफलातून चारचाकी गाडी तयार केली असताना त्याला पुढील दिशा मिळण्यासाठी आणि सहकार्यासाठी मोठमोठ्या राजकीय नेत्यांनीच आणि काही उद्योजकांनी अनास्था दाखवल्यामुळे त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून कोणीतरी आपल्या तंत्रज्ञानाकडे पाहतील आणि आपल्या कल्पनेतून तयार झालेली गाडी रस्त्यावर धावेल हे स्वप्न पहाणाºया यमगे, ता. कागल येथील अवलियाचे नाव आहे संजय शंकर हुल्ले.
यमगे येथील संजय हुल्ले हा तसा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला. शिकण्याची इच्छा प्रबळ असतानाही घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा गाडा निम्म्यावरच थांबवावा लागला. संजयला लहानपणापासून गाड्याबाबत कमालीची उत्सुकता. तो गावातील एका ट्रॅक्टरवर माती भरण्याचे काम करत होता. काही दिवसानंतर तो त्याच ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला व आजपर्यंत कार्यरत आहे.
काहीतरी वेगळं करायचं या इराद्याने कार्यरत असणाºया संजयला वाचनाची आवड जास्तच. त्यातूनचपंतप्रधान मो दींच्या ‘मेक इन इंडिया’बाबत वाचलं आणि त्याची अनेक वर्षांपासून मनात घर करून बसलेली गाडी निर्मितीचं स्वप्न सत्यात आणण्याचा संकल्प बळावला. त्या दृष्टीने त्याने सुरुवात केली. दुसºयाच्या ट्रॅक्टरवर मोलमजुरी करून गोळा केलेली पै आणि पै त्याने खर्च केली. गावातील काहीनी त्याला मदत केली. त्यातून दिवसभर मोलमजुरी व रात्री घरात, दारातच या गाडीचे काम त्याने सुरु केले.
सुरुवातीला गावकºयांनीही हा निव्वळ वेडेपणा आहे म्हणून त्याला हिणवलेही, पण आज संजयने तयार केलेली रस्त्यावर धावणारी चारचाकी गाडी दारात उभा असल्याचे पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली आहेत.
आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या गाडीमुळे इंधनाची मोठी बचत होणार असून, पूर्णपणे निसर्गाशी निगडीत या गाडीचे धावण्याचे तंत्र आहे. अर्थात यामुळे गाड्यांमुळे वाढणाºया प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही गाडी तिचे तंत्र, ड्रॉइंग घेऊन संजय अनेक उद्योजकांना भेटला, पण ते तंत्र आणि डिझाइन आपल्याला द्या, त्या बदल्यात आपण काही रक्कम आपल्याला देण्याचे आमिषही दाखवल्याचे या युवकाने सांगितले. आपण तयार केलेली गाडी सर्वसामान्यांसाठी असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आणि याचे पेटंट घेण्यासाठी या तरुणाला आर्थिक आणि सल्ला मार्गदर्शनाची गरज आहे.
कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ समजले जाते. कोणत्याही विकासकामाला चालना या ठिकाणी सर्वप्रथम मिळते, पण या उमद्या तरुणाने तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. पण अपेक्षित यश आले नाही, पण या सगळ्याबाबत या तरुणाने नाराजी व्यक्त करत आपल्या या लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या गाडीला पेटंट मिळून रीतसर मान्यता मिळवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

संजयकडून लेखनही
समाजापासून थोडेसे अलिप्त असणाºया संजयला लेखनाचाही छंद आहे. त्याने आतापर्यंत तीन चित्रपट कथा लिहिल्या आहेत. याबाबत तो नाना पाटेकर यांच्यापर्यंत पोहोचला होता. या क्षेत्रातही त्याला संधी मिळाली नसल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Empowering Wings of Yameg's Young Wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.