म्हैस दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:28+5:302021-07-17T04:19:28+5:30
कागल : गोकुळ दूध संघाने दैनंदिन २० लाख लिटरचे लक्ष ठेवले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत गोकुळ उत्पादित म्हशीच्या दुधाला मोठी ...
कागल : गोकुळ दूध संघाने दैनंदिन २० लाख लिटरचे लक्ष ठेवले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत गोकुळ उत्पादित म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. त्यामुळे कागल तालुक्यातून दूध संस्था व उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त म्हैस दूध उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना संचालक नवीद मुश्रीफ यांनी केल्या.
कागल तालुक्यातील गोकुळ दूध संघातील सर्व निरीक्षकांची बैठक नवीद मुश्रीफ यांनी घेतली. त्यामध्ये तालुक्यातील दूध उत्पादन आणि दुग्ध व्यवसाय, दूध संस्था यांचा आढावा घेऊन अडचणीही समजावून घेतल्या. या वेळी निरीक्षकांच्यावतीने नवीद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चौकट
म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज..
नवीन संचालक मंडळाने म्हशीच्या दुधाला दोन रुपये व गाईच्या दुधाला एक रुपये अशी दर वाढ दिली आहे. दूध संकलन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ व जिल्हा बँकेच्या सहकार्यातून दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्ज प्रकरण करणार आहोत, असे नवीद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
१६ कागल नवीद मुश्रीफ
फोटो कॅपशन
कागल तालुक्यातील गोकुळ दूध संघाच्या निरीक्षकांनी नवीद मुश्रीफ यांचा सत्कार केला.