आंदोलनात भाग न घेतलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना सरकारकडून प्रोत्साहन पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:16 PM2017-09-19T17:16:17+5:302017-09-19T17:21:16+5:30
सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : आंदोलनात भाग न घेता ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवलेले आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभिंनदन पत्र देण्यात आलेले आहे.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे दिनांक ११ सप्टेंबर २0१७ पासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन सुरु आहे, या आंदोलनात ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी भाग न घेता अंगणवाडी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवले, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दिनांक १४ सप्टेंबर २0१७ रोजी अभिंनदन पत्र देण्यात आले.
यामध्ये या बालके व महिला योजनेच्या लाभांपासून वंचित राहून त्यांना या संपाची झळ पोहोचू नये या उदात्त हेतूनेच ही अभिनंदनपर पत्र दिल्याचा उल्लेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी या पत्रात केला आहे.
शासन निर्देशानुसार अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन कार्यवाही सुरु आहे, असे असुनही अंगणवाडी कर्मचाºयांनी संप सुरुच ठेवलेला आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व महिला व बाल विकास विभागांतर्गत ६ वर्षे वयोगटातील मुलांना पोषण आहारांतर्गत गरम ताजा आहार व सेवांवर परीणाम होऊन बालके सदर सेवांपासून वंचित राहत आहेत.
अंगणवाडीतील बालके पूरक पोषण आहार, आरोग्य सेवा या सारख्या अतिमहत्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत या दृष्टीने संप कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्प कुडाळ मधील ७ व प्रकल्प कणकवली मधील २ अंगणवाडी केंद्र संबंधित अंगणवाडी सेविका / मदतनीस यांनी नियमित सुरु ठेवून या योजनेचे लाभ मुलांना देवून चांगले काम केलेले आहे.
६ वर्षे वयोगटापर्यंतची लहान बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार तसेच आरोग्य विषयक सेवा नियमित देणे त्यांचे पोषणवृध्दीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळा ऋतुचा विचार करता या सेवा सदर लाभार्थींना नियमित देणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे सुध्दा आहे.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याने संपात सहभागी अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाडी लाभार्थींच्या सेवांचा विचार करुन त्वरीत अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित राहून अंगणवाडीचे कामकाज सुरळीत व नियमित सुरु करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केलेले आहे.