सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:49+5:302021-08-28T04:28:49+5:30
कसबा बावडा: साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेली सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड ...
कसबा बावडा:
साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेली सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देणारी आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. साळोखेनगर येथील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'सतेज मॅथ्स स्कॉलर-२०२१' परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संस्थेने सुरू केलेल्या कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, बॉट लॅब, इंटरनेट ऑफ थिंग्स, लॅब, तेजस इनोव्हेंशन सेंटर यांसारख्या सुविधा राज्यातील इतर संस्थांना निश्चितच अनुकरणीय आहेत. हा उपक्रम सर्वांसाठी पायोनीअर ठरणार असून, यातून विद्यार्थ्यांची गणित विषयाबद्दलची भीती कमी होऊन त्याची गोडी निर्माण होईल व समाजाचा गणित विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कॅम्पसचे समन्वयक डॉ. अभिजीत माने उपस्थित होते. या परीक्षेमध्ये अभिषेक चव्हाण, प्रतीक पाटील, गिरीश पाटील यांनी प्रथम क्रमांक, वैष्णवी पाटील, वेदांत पाटील यांनी द्वितीय तर अभिनंदन जुगले, मनीषा कळके यांनी तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.
फोटो: २७ डीवायपी
सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत आमदार ऋतुराज पाटील.