बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:01+5:302021-04-24T04:23:01+5:30

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या ...

Encroach on Balinga Water Treatment Plant | बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

Next

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या संरक्षक भिंती गायब होत आहेत. यामुळे चारही बाजूने जलशुद्धीकरण केंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

भोगावती नदीवर ७० वर्षांपूर्वी पंपहाऊस उभारण्यात आले.यासाठी बालिंगा येथे नागदेववाडी येथील

शेतकऱ्यांची २३ एकर जमीन घेऊन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध उपकरणे बसवण्यात आली. यातून जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून जवळपास अर्धे शहर, चार-पाच उपनगरे याचबरोबर शेजारी असणाऱ्या शेकडो कॉलनींची तहान भागवत आहे.

पण या जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला ७० वर्षांपूर्वी बांधलेली दगडी सुरक्षा भिंत होती. पण सध्या ती चारही बाजूने जमीनदोस्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवती अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. या शिवाय या संपूूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकट : सुरक्षा चौकीभाेवती कचऱ्याचे ढीग

कोल्हापूर: गगनबावडा मार्गाकडे पूर्वेला सुरक्षा चौकी आहे. पण तिथे सुरक्षारक्षक नाही. या चौकीभोवती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या केंद्राजवळ तळीरामांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे येथे दिवसाही त्यांचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे कचऱ्याबरोबरच बाटल्यांचा खचही नेहमी पडलेला दिसतो.

फोटो: २३ बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा भिंत गायब झाली असून काही ठिकाणी अतिक्रमण सुरू झाले आहे.

Web Title: Encroach on Balinga Water Treatment Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.