जिल्हा परिषदेच्या ४६ जागांवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:53 AM2018-10-30T00:53:54+5:302018-10-30T00:53:58+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बाराही तालुक्यांमध्ये ३ हजार ८३७ मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले असून, यातील ४६ मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचे ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बाराही तालुक्यांमध्ये ३ हजार ८३७ मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले असून, यातील ४६ मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचे उघडकीस आले आहे. मालमत्ता नोंदीसाठी सामान्य प्रशासन विभागाने उघडलेल्या खास मोहिमेअंतर्गत ही बाब स्पष्ट झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची एकत्रित माहितीच जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नव्हती. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविकांत आडसूळ यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी या सर्व मालमत्तांची आनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिनाभर जिल्ह्यात या मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू होते.
याची आकडेवारी उपलब्ध झाली असून, राधानगरी तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७०८ जिल्हा परिषदेच्या मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल शिरोळ तालुक्यामध्ये ५०४ मालमत्ता असून, तिसऱ्या क्रमांकावर पन्हाळा तालुक्यामध्ये मालमत्ता आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावरील मालमत्तांचा समावेश आहे. आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभागाच्या इमारती, महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या, शिक्षण विभागाच्या शाळा, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन दवाखाने या इमारतींचा समावेश आहे.
ही अतिक्रमणे हटविण्यासाठीही मोहीम हाती घेणार आहे.
उघड झालेली अतिक्रमणांची तालुकावार संख्या अशी
जिल्ह्यामध्ये २००० प्राथमिक शाळा असल्या तरी काही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असल्याने त्यांचा समावेश या आकडेवारीमध्ये झालेला नाही. तालुकावार मालमत्ता -
शाहूवाडी ११८, पन्हाळा ४६६, हातकणंगले २६६, शिरोळ ५०४, करवीर ३६१, गगनबावडा ६३, राधानगरी ७०८, चंदगड २२९, कागल ३१८, भुदरगड २४२, आजरा २८४, गडहिंग्लज २७८.