अतिक्रमण, गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:42+5:302021-09-07T04:30:42+5:30
कोल्हापूर : रहिवासी जागेचा अटीचा भंग, रस्त्यावरच घर बांधून केले अतिक्रमण, अवैध दारूधंदा, सातबारामधील बदल, गुन्हा नोंदीत टाळाटाळ अशा ...
कोल्हापूर : रहिवासी जागेचा अटीचा भंग, रस्त्यावरच घर बांधून केले अतिक्रमण, अवैध दारूधंदा, सातबारामधील बदल, गुन्हा नोंदीत टाळाटाळ अशा विविध अडचणींवर नागरिकांनी सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात दाद मागितली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपक्रमात १५ तक्रारी दाखल झाल्या.
या वेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसीलदार रंजना बिचकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी महसूलचे ९, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे २, गटविकास अधिकारी करवीर १, जिल्हा परिषद १, पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित २ अशा १५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती तहसीलदार रंजना बिचकर यांनी दिली.
---