देवाळे येथे शेतीकडे जाणाऱ्या पाणंदी केल्या अतिक्रमणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:39+5:302021-02-12T04:23:39+5:30
सडोली (खालसा) : देवाळे ता. करवीर येथील शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने बऱ्याच ठिकाणी तर रस्ते बंद ...
सडोली (खालसा) : देवाळे ता. करवीर येथील शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने बऱ्याच ठिकाणी तर रस्ते बंद पडले होते. यावर करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी धनाजी कलिकते यांनी लोकसहभागातून देवाळे येथील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी खुले केले. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. खुल्या झालेल्या रस्त्याचे उद्घाटन तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी तलाठी संजीवनी भोसले, भीमराव पाटील, निवास पाटील, माजी सरपंच दीपक सुतार, राजाराम कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
११ देवाळे पाणंद रस्ता
फोटो ओळ
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत देवाळे ता. करवीर येथील पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून त्याचे उद्घाटन करताना करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भामरे, मंडल अधिकारी धनाजी कलिकते, तलाठी व इतर.
माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्मार्टफोन वरून पाठवले.