कोल्हापूरात अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांचे अतिक्रमण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:41 PM2019-06-25T14:41:39+5:302019-06-25T17:41:33+5:30
अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दिसू लागले.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दिसू लागले.
देवस्थान समितीने गेल्या महिन्याभरापासून अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली आहे. याअंतर्गत महापालिकेच्या सहकार्याने सुरूवातीला महाद्वारातील फेरीवाले आणि दुकानदारांचे अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या मंदिरातील दुकानदारांनी ओवऱ्यांच्या पुढे पाच फुट अतिक्रमण केले होते.
येथील सर्वच दुकानांमध्ये पुजेच्या साहित्यांपेक्षा इमिटेशनर ज्वेलरी, खेळणीसह वेगवेगळ््या प्रकारचे साहित्य मांडण्यात आले होते. या साहित्यांची भाविकांना अव्वाच्या सव्वा दरात विक्री केली जात होती. याबाबत दोन आठवड्यांपूर्वी दुकानदारांसोबत झालेल्या बैठकीत देवस्थान समितीने अतिक्रमण हटवण्यासाठी २४ तारखेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र सोमवारपर्यंत परिस्थिती जैसे थे होती.
सोमवारी सायंकाळी समितीने पुन्हा दुकानदारांची बैठक घेवून अतिक्रमण हटवण्याची सुचना केली अन्यथा मंगळवारी समिती स्वत: कारवाई करेल असा इशाराही देण्यात आला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकानदारांच्या काहीच हालचाली न दिसल्याने देवस्थान समितीने कर्मचाऱ्यांमार्फत अतिक्रमण हटवण्यास व दुकानातील साहित्य जप्त करण्यास सुरूवात केली.
समितीने सुरू केलेली कारवाई पाहताच अन्य दुकानदारांनी स्वत:हून दुकानाबाहेर मांडलेले साहित्य काढायला सुरूवात केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या सुचनेनुसार सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे यांनी स्वत: समोर उभारून ही कारवाई पार पाडली.
या परिसरातील लॉटरीचे दुकानही बंद करायला लावण्यात आले. त्याऐवजी देवीच्या ओटीचे साहित्य ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. समितीने केलेल्या कारवाईमुळे या दुकानांमध्ये पहिल्यांदाच साडी ओटी, देवीची मुर्ती, कवड्यांची माळ, हळद-कुंकू असे पुजेचे साहित्य ठळकपणे दिसू लागले आहे. यापूर्वी इमिटेशन ज्वेलरी आणि तत्सम साहित्यांमुळे ही दुकाने नेमकी कशाची आहेत