‘नवी ज्ञानसंस्कृती’साठी विश्वकोश काम करील

By admin | Published: May 10, 2017 01:15 AM2017-05-10T01:15:34+5:302017-05-10T01:15:34+5:30

दिलीप करंबेळकर : शिवाजी विद्यापीठातील नोंदलेखक कार्यशाळेत मांडले विचार

The Encyclopaedia will work for the 'new knowledge culture' | ‘नवी ज्ञानसंस्कृती’साठी विश्वकोश काम करील

‘नवी ज्ञानसंस्कृती’साठी विश्वकोश काम करील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क ---कोल्हापूर : राज्यात नव्या ज्ञानसंस्कृतीची चळवळ रुजविण्यासाठी मराठी विश्वकोश सर्वांसाठी मुक्त विद्यापीठ म्हणून काम करील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोेश निर्मिती मंडळातर्फे आयोजित मराठी विश्वकोश नोंदलेखक कार्यशाळेत ते बोलत होते. वि. स. खांडेकर भाषाभवनमधील या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. अध्यक्ष दिलीप करंबेळकर म्हणाले, मराठी विश्वकोशाची ज्ञानमंडळे विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे ४५ विषयांची ज्ञानमंडळे स्थापन झाली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी ज्ञानमंडळे स्थापन होतील. डॉ. शिर्के म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत भूमिका घेत विश्वकोशाने केलेली वाटचाल गौरवास्पद
आहे.
विश्वकोश हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ असल्याने अधिकाधिक लेखकांनी यात सहभागी व्हावे. कार्यक्रमास ज्ञानमंडळाचे समन्वयक प्रा. डॉ. राजन गवस, अवनीश पाटील, सुधीर पोटे, डॉ. राजा दीक्षित, सतीश बडवे, चैतन्य कुंटे, वासंती रासम, नंदा पारेकर, भारती पाटील, उत्तरा सहस्रबुद्धे, अनिल सडोलीकर, रणधीर शिंदे, विश्वकोश मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, अरुण फडके, दीपक जेवणे, सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर, वर्षा
देवरुखकर, आदींसह लेखक, विषयतज्ज्ञ उपस्थित होते. विश्वकोश मंडळाचे सहायक सचिव सरोजकुमार मिठारी यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मोरे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले.

Web Title: The Encyclopaedia will work for the 'new knowledge culture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.