...तर आम्ही आरक्षण सोडायला तयार: रामदास आठवले

By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 08:39 PM2020-12-08T20:39:07+5:302020-12-08T20:40:50+5:30

"मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे. पण आर्थिक निषकावर आरक्षण देता येत नसल्याने जातीच्या आधारावच आरक्षण असावे", असेही ते पुढे म्हणाले. 

end the caste system then we are ready to leave the reservation says ramdas athawale | ...तर आम्ही आरक्षण सोडायला तयार: रामदास आठवले

...तर आम्ही आरक्षण सोडायला तयार: रामदास आठवले

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात जातीनिहाय जनगणना करायला हवी, रामदास आठवलेंची मागणीकृषी कायद्यांवरुन माथी भडकवण्याचं काम होत असल्याचा आरोपआर्थिक निकषावर आर्थिक आरक्षण देता येत नसल्याचं आठवले म्हणाले

कोल्हापूर
"आज आमच्या जातीवर अन्याय होत आहे. त्यामुळे जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे. तुम्ही जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो", असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे. पण आर्थिक निषकावर आरक्षण देता येत नसल्याने जातीच्या आधारावच आरक्षण असावे", असेही ते पुढे म्हणाले. 

जातीनिहाय जनगणना हवी
देशात कोणत्या जातीचा किती टक्का आहे, हे आता समजत नाही. प्रत्येक जातीची जनगणना होणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२१ ची जनगणना जात निहाय होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं. 

कृषी कायद्यांवरुन मुद्दाम डोकी भडकवण्याचं काम
केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. पण काही संघटनांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना सरकारविरोधात भडकवले जात आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. संघटनांनी हटवादी भूमिका सोडली तर केंद्र सरकार चर्चेला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: end the caste system then we are ready to leave the reservation says ramdas athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.