चर्चेअंती स्वातंत्र्यदिनीच १३ आत्मदहन आंदोलने स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:49+5:302021-08-17T04:28:49+5:30

कोल्हापूर : विविध प्रकरणांत अन्याय झालेल्या एकूण २६ जणांनी दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह विविध ...

At the end of the discussion, 13 self-immolation agitations were postponed on Independence Day itself | चर्चेअंती स्वातंत्र्यदिनीच १३ आत्मदहन आंदोलने स्थगित

चर्चेअंती स्वातंत्र्यदिनीच १३ आत्मदहन आंदोलने स्थगित

Next

कोल्हापूर : विविध प्रकरणांत अन्याय झालेल्या एकूण २६ जणांनी दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह विविध ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामध्ये १३ जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, पण विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी त्या-त्या संबंधित खात्याच्या प्रश्नाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी आंदोलकांची चर्चा घडवून आणली. त्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने रविवारी, १५ ऑगस्ट रोजी होणारी आंदोलने स्थगित झाली. त्यामुळे पोलीस खात्याने नि:श्वास सोडला. तरीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त होता.

१) दादू धनवडे, शामराव धनवडे, विश्वास धनवडे (रा. धामोड, ता. राधानगरी).- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन - पुनर्वसनासाठी मिळालेल्या जमिनीचे ७/१२ पत्रकी इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा शेरा कमी करावा- राधानगरी पोलिसांनी बैठक घेऊन मार्ग काढला.

२) दगडू आनंदा माने (रा. कुंभोज, ता. हातकणंगले)- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन- पोलीस व पोलीस उपअधीक्षकांचे वाचकवर कारवाईची मागणी - पोलीस उपअधीक्षकांनी चर्चेनंतर सकारात्मक तोडगा काढला.

३) वसंत खांडेकर (रेंदाळ)-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन- शेजाऱ्याचे अतिक्रमण काढण्याची मागणी - रेंदाळ ग्रामपंचायतीशी चर्चेअंती आश्वासन दिले.

४) बळवंत पोवार (वठार तर्फ वडगाव) - यांचा आत्मदहनाचा इशारा - अतिक्रमण काढणेची मागणी - वडगाव पोलिसांनी चर्चा केल्याने आंदोलन स्थगित.

५) पुरुषोत्तम गावडे (रा. मुक्तसैनिक वसाहत)- विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा- अर्जाची चौकशी होऊन न्याय मिळण्याची मागणी -शाहूपुरी व गोकुळ शिरगाव पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

६) आंबेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा- आंबेवाडी गावच्या पूरपरिस्थितीमुळे पुनर्वसन करण्याबाबत -करवीर तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा

७) प्रतिभा सर्जेराव चौगुले, (सम्राटनगर)- जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा-निलंबन काळ हा सेवा काळ म्हणून गणला जावा- संबंधित प्रश्नी जलसंधारण अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणल्याने आंदोलन स्थगित.

८) सम्राट म्हसवेकर (मुरगूड)- पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा- तक्रार अर्जावर कायदेशीर कारवाई होत नसलेबाबत- मुरगूड पोलिसांशी बैठकीत सकारात्मक तोडगा.

९) विठ्ठल पाणी सह. पाणीपुरवठा संस्था (दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) - जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर इशारा- अपहारातील दोषीवर कारवाई होत नसल्याने आंदोलन- इस्पुर्ली पोलिसांनी घडवली उपनिबंधक कार्यालयाशी सकारात्मक चर्चा.

१०) सागर कोरी (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज)-जिल्हाधिकारी कार्यालय-उसनवारी भरलेल्या पैशाबाबत न्याय मिळावा- गडहिंग्लज पोलिसांशी सकारात्मक चर्चा

११) विजय दिवाण (रा. घोटवडे, ता. पन्हाळा)- जिल्हाधिकारी कार्यालय- न्याय मिळणेबाबत- पन्हाळा पोलिसांनी चर्चेनंतर केले मतपरिवर्तन.

१२) आनंदा पाटील (गोकुळ शिरगाव)- जिल्हाधिकारी कार्यालय- न्याय मिळणेबाबत - गोकुळ शिरगाव पोलिसांशी बैठकीनंतर आंदोलन स्थगित.

याशिवाय विविध प्रश्नांबाबत दहाजणांनी आमरण उपोषण, एकाने ठिय्या आंदोलन, एकाने निदर्शनाचा इशारा दिलेला होता, तसेच ॲड. अरुण सोनाळकर (रा. कौलव, ता. राधानगरी) यांनी काळम्मावाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी जलसमाधीचा इशारा दिला होता, पण पुनर्वसन अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेनंतर तेही आंदोलन स्थगित करण्यात आले.

Web Title: At the end of the discussion, 13 self-immolation agitations were postponed on Independence Day itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.