gokul Result : पाचव्या फेरीअखेर विरोधी आघाडी १२, सत्तारूढ ४ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 06:25 PM2021-05-04T18:25:55+5:302021-05-04T18:27:36+5:30

gokul Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत सायंकाळी सव्वासहा वाजता संपलेल्या पाचव्या फेरी अखेर विरोधी आघाडीचे १२ तर सत्तारुढ आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. अजून चार फेऱ्या मोजायच्या शिल्लक असून असाच कल राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संघात सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

At the end of the fifth round, the opposition is leading at 12 and the ruling party at 4 | gokul Result : पाचव्या फेरीअखेर विरोधी आघाडी १२, सत्तारूढ ४ आघाडीवर

gokul Result : पाचव्या फेरीअखेर विरोधी आघाडी १२, सत्तारूढ ४ आघाडीवर

Next
ठळक मुद्देपाचव्या फेरीअखेर विरोधी आघाडी १२, सत्तारूढ ४ आघाडीवरअजून चार फेऱ्या मोजायच्या शिल्लक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत सायंकाळी सव्वासहा वाजता संपलेल्या पाचव्या फेरी अखेर विरोधी आघाडीचे १२ तर सत्तारुढ आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. अजून चार फेऱ्या मोजायच्या शिल्लक असून असाच कल राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संघात सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सत्तारूढ आघाडीतून अंबरिश घाटगे, चेतन नरके, वसंत खाडे व उदय निवासराव पाटील सडोलीकर हे आघाडीवर आहेत. संघाचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे, ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील मुरगूडकर ही पिछाडीवर आहेत. विरोधी आघाडीतील वीरेंद्र मंडलिक, विद्याधर गुरबे, एस.आर.पाटील महाबळेश्वर चौगुले हे उमेदवार मागे आहेत. पाच‌व्या फेरीअखेर अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील, अजित नरके हे मतांत सर्वात पुढे आहेत.

Web Title: At the end of the fifth round, the opposition is leading at 12 and the ruling party at 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.