हसन मुश्रीफांवर पुन्हा छापा; तब्बल दहा तासांहून अधिक चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:14 AM2023-03-12T05:14:50+5:302023-03-12T05:16:36+5:30
आतापर्यंत ईडीने तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्याने त्यांच्या समर्थकांमधून संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर शनिवारी सकाळी ईडीच्या पथकाने पुन्हा छापा टाकला. तब्बल दहा तासांहून अधिक काळ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आतापर्यंत ईडीने तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्याने त्यांच्या समर्थकांमधून संताप व्यक्त होत ईडी पथकाच्या समोरच शंखध्वनी केल्याने वातावरण तणावपूर्ण होऊन पोलिस व कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली.
आमदार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीतील व्यवहारावरून ‘ईडी’ च्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. शनिवारी सकाळी दहा गाड्यांतून सुमारे २४ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यापैकी बारा जणांनी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला. दुपारी साडेबारापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्यातील सहा जण तेथून निघून गेले.
समन्स बजावले
हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याचे कळते. मात्र त्यांना कधी बोलावले आहे, याबाबत स्पष्टता नव्हती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"