इचलकरंजी पालिकेत अभियंता व पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात, सामाजिक कार्यकर्त्यांनी उडविले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 03:16 PM2021-11-16T15:16:16+5:302021-11-16T15:16:58+5:30

नगरपालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजताच नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके उडवले.

Engineer of Ichalkaranji Municipal Town Planning Department and his punter arrested while accepting bribe of Rs 20,000 | इचलकरंजी पालिकेत अभियंता व पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात, सामाजिक कार्यकर्त्यांनी उडविले फटाके

इचलकरंजी पालिकेत अभियंता व पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात, सामाजिक कार्यकर्त्यांनी उडविले फटाके

googlenewsNext

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील अभियंता व त्याच्या पंटरला वीस हजारांची लाच स्विकारताना कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. अभियंता बबन खोत व त्याचा पंटर किरण कोकाटे अशी या दोघांची नावे आहेत. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असताना ही कारवाई झाल्याने पालिका वतुर्ळात खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी, शहरातील एका नागरिकाने नगररचना विभागाकडे गुंठेवारीचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी फाईल दिली होती. यासाठी संबंधित व्यक्तीकडून २५ हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी कोकाटेच्या माध्यमातून ही रक्कम अभियंता खोत घेणार होता. याची तक्रार संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे केली होती.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालिकेतील नगररचना विभागाच्या आवारातच ही लाच स्विकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दोघांना पकडले. चार दिवसांपासून या प्रकरणाची पडताळणी कारवाईपूर्वी पथकातील कर्मचाऱ्याकडून सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून पालिका कर्मचाऱ्याच्या कामकाजाबाबत तक्रारी सुरू होत्या. पालिकेत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पुरे, विकास माने, सुनील घोसाळकर, मयूर देसाई, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.

सामाजिक कार्यकर्त्यांनी उडविले फटाके

नगरपालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजताच नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके उडवले.

Web Title: Engineer of Ichalkaranji Municipal Town Planning Department and his punter arrested while accepting bribe of Rs 20,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.