राष्ट्रउभारणीसाठी अभियंत्यांचे योगदान मोलाचे : प्रतापसिंह देसाई
By Admin | Published: January 28, 2015 11:21 PM2015-01-28T23:21:20+5:302015-01-29T00:08:57+5:30
येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘इमर्जिंग ट्रेन्डस् इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड आर्किटेक्चर २०१५’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कसबा बावडा : जागतिक पातळीवर विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रांत वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामध्ये वेगवान बदल घडत आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य अभियंत्यांच्या हातात असून, राष्ट्रउभारणीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरत आहे, असे प्रतिपादन इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांनी येथे केले.
येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘इमर्जिंग ट्रेन्डस् इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड आर्किटेक्चर २०१५’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय घोरपडे, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. परिषदेत २६० विद्यार्थ्यांनी आपले नावीन्यपूर्ण संकल्पाने वरील संशोधनात्मक शोधनिबंध सादर केले.प्रा. प्रतापसिंह देसाई म्हणाले, प्राध्यापकानीसुद्धा विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य विकसित केले पाहिजे. तसेच अभियंत्यांनी उद्योगविश्वामध्ये काम करताना आपल्याच क्षेत्रापुरते मर्यादित न राहता बहुउद्देशीय ज्ञान संपादन करून सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, विद्यार्थ्यांचे संशोधन हे समाजाच्या प्रश्नांशी निगडीत असले पाहिजेत. प्राचार्य डॉ. विनय घोरपडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेकरिता आय.आय.आय.डी., आय.एस.टी.ई. व इस्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रा. अभय जोशी यांनी आभार मानले. प्रा. ए. एन. जाधव, प्रा. साकील मुजावर, सुप्रिया चव्हाण, आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘इमर्जिंग ट्रेन्डस्’ या शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन करताना प्रा. प्रतापसिंह देसाई, प्रा. महेश काकडे, प्रा. विजय घोरपडे, प्रा. अभय दोषी, आदी उपस्थित होते.