इंग्रजीतून ६१३ विद्यार्थी मराठी माध्यमात

By admin | Published: November 14, 2016 09:36 PM2016-11-14T21:36:50+5:302016-11-14T21:34:18+5:30

४५0 शाळा होणार डिजिटल : १४३८ शाळा झाल्या तंबाखूमुक्त

In English, 613 students speak English | इंग्रजीतून ६१३ विद्यार्थी मराठी माध्यमात

इंग्रजीतून ६१३ विद्यार्थी मराठी माध्यमात

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असलेली ६१३ मुले पुन्हा मराठी शाळांमध्ये येणे, १४३८ शाळा तंबाखूमुक्त होणे यातून हे बदलते चित्र स्पष्ट होत आहे.
सलाम मुंबई फाऊंडेशनने तंबाखूमुक्त शाळेसाठी शिक्षण विभागाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात काम सुरू केले आहे. तंबाखूमुक्त शाळेसाठी १0 निकष ठरविण्यात आले आहेत. अगदी शाळेपासून किती अंतरावर पानाची टपरी असावी, इथपासून शिक्षकांच्या तंबाखू खाण्यापर्यंतचे हे निकष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २00४ प्राथमिक शाळांपैकी १४३८ शाळा तंबाखूमुक्त झाल्याने हे शिक्षण विभागाला मिळालेले मोठे यश आहे. ही संख्या वाढविण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
गावागावांत इंग्रजी शाळांचे पेव वाढले असताना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालक दुर्लक्ष करीत होते. इंग्रजीची अनावश्यक ओढ, त्यासाठीचा अट्टाहास यांचा विचार करता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भराभर मुले घातली गेली. मात्र, एकूणच या शाळांतील सर्वसाधारण इंग्रजी अध्यापनाचा दर्जा हा तितकासा चांगला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातील अनेक नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये हा दर्जा राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणात्मक बदल होत असल्याचे जाणवल्यानंतर ६१३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुन्हा मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, शिक्षण समितीचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्या अथक प्रयत्नांतून ही उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत.
दबावाच्या राजकारणात चांगले काम
शिक्षकांच्या बदल्यांच्या विषयावरून शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांना टार्गेट करण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. याबाबत पदाधिकारी आणि त्यांच्यामध्ये मतभेदही झाले. जिल्हा परिषदेत त्याची जोरदार चर्चाही झाली. मात्र, यातूनही पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांना शक्य तेवढे सहकार्य करीत सुभाष चौगुले यांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. डॉ. कुणाल खेमनार यांचे अधिकाऱ्यांना असलेले पाठबळीही यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. म्हणून संघटनांच्या नेत्यांनाही निलंबित करण्याचे धाडस दाखविले गेले.

तालुकानिहाय मराठी माध्यम प्रवेश व तंबाखूमुक्त शाळा

तालुकाविद्यार्थ्यांची तंबाखूमुक्त
संख्याशाळा
आजरा३६८0
भुदरगड९२१0८
चंदगड७८९९
गडहिंग्लज५९१0९
गगनबावडा0६७0
हातकणंगले५९१२0
कागल५७१३३
करवीर४५१२0
पन्हाळा४0१0६
राधानगरी४५१९३
शाहूवाडी३२१८९
शिरोळ६४१११
एकूण६१३१४३८

लोकसहभाग आणि जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ४४२ डिजिटल शाळांमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. त्यासाठी रोटरी क्लबने १२३ शाळांना सॉफ्टवेअर प्रदान केले आहेत. यावर्षी स्वनिधीतून दीड कोटी रुपये उपलब्ध करू न देण्यात आल्याने ४५0 शाळा डिजिटल करण्यात येणार असून, तेथेही ई-लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन सुरू होणार आहे.

Web Title: In English, 613 students speak English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.