‘तिमिर भेद’ कादंबरीचे इंग्रजीत प्रकाशन हीच अरुण चव्हाण यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:46+5:302021-06-02T04:18:46+5:30

कोल्हापूर : प्रा. अरुण चव्हाणलिखित ‘तिमिर भेद’ या कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा ...

The English publication of the novel 'Timir Bheed' is a tribute to Arun Chavan | ‘तिमिर भेद’ कादंबरीचे इंग्रजीत प्रकाशन हीच अरुण चव्हाण यांना श्रद्धांजली

‘तिमिर भेद’ कादंबरीचे इंग्रजीत प्रकाशन हीच अरुण चव्हाण यांना श्रद्धांजली

Next

कोल्हापूर : प्रा. अरुण चव्हाणलिखित ‘तिमिर भेद’ या कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास ऑनलाइन शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केला. चव्हाण यांच्यामुळेच अवनीची ओळख राज्याबाहेर देशविदेशात पोहोचली, अशी कृतज्ञताही व्यक्त केली. अवनिचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. कोल्हापूरसह राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र ऑनलाइन शोकसभेचे आयोजन केले होते. यात प्रा. जे.बी. कदम, माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रा. रणधीर शिंदे, माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, भाकपचे सचिच दिलीप पवार, महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर, आर.वाय. पाटील, अविनाश सप्रे, हसन देसाई, संजय पाटील, सोहन शिरगावकर, विजय पाटील, सदाशिव रेडेकर यांनी सहभाग घेतला. अवनिच्या उपाध्यक्ष अनुराधा भोसले यांनी शोकसभेचे सूत्रसंचालन केले.

Web Title: The English publication of the novel 'Timir Bheed' is a tribute to Arun Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.