शिक्षणातून क्षमता वृद्धिंगत करा- देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती गुणगौरव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:53 AM2018-09-05T00:53:49+5:302018-09-05T00:54:33+5:30

स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी शिक्षण हे उत्तम प्रकारचे साधन आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात. त्याचबरोबर संशोधन, व्यवस्थापन आणि कौशल्ये आत्मसात करावीत,

 Enhance capacity through education - Devanand Shinde: Shivaji University scholarship gravitation program | शिक्षणातून क्षमता वृद्धिंगत करा- देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती गुणगौरव कार्यक्रम

शिक्षणातून क्षमता वृद्धिंगत करा- देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठ शिष्यवृत्ती गुणगौरव कार्यक्रम

Next

कोल्हापूर : स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी शिक्षण हे उत्तम प्रकारचे साधन आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात. त्याचबरोबर संशोधन, व्यवस्थापन आणि कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.

विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिष्यवृत्ती गौरव कार्यक्रम म्हणजे महाविद्यालयांच्या यशाचे, प्रगतीचे आणि त्यांच्या क्षमतेचे प्रतीक आहे. विवेकी विचारांची महाविद्यालये उत्तम प्रकारची संस्कारकेंद्रे आहेत.

प्राचार्यांनी व्यापक दृष्टीने हे संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्यास महाविद्यालय, संस्थेप्रती विद्यार्थ्यांत आदरभाव निर्माण होईल. या कार्यक्रमात सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या शहरी, निमशहरी व ग्रामीण या गटांतून सर्वप्रथम आलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.विवेकानंद महाविद्यालय, घाळी कॉलेज अव्वलसन २०१७-१८ मध्ये गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविणाºया निमशहरी आणि ग्रामीण महाविद्यालयांच्या गटात विवेकानंद महाविद्यालय व गडहिंग्लजचे घाळी कॉलेज अव्वल ठरले. शिष्यवृत्ती मिळालेली विद्याशाखा, गटनिहाय महाविद्यालये : कला शाखा (अनुक्रमे शहरी, निमशहरी, ग्रामीण गट) : विवेकानंद महाविद्यालय, घाळी कॉलेज, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव (सांगली). वाणिज्य : विवेकानंद महाविद्यालय, घाळी कॉलेज, वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वानलेसवाडी (सांगली).

विज्ञान : विवेकानंद महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालय, कºहाड; आर. बी. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड. अभियांत्रिकी : शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर आणि टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी; केआयटी कॉलेज.
विधी : शहाजी लॉ कॉलेज, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज (कºहाड). शिक्षणशास्त्र : शिवाजी विद्यापीठ शिक्षणशास्त्र विभाग, कर्मवीर हिरे आर्टस, कॉमर्स, सायन्स अँड एज्युकेशन, गारगोटी.


शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये विवेकानंद महाविद्यालय अव्वल ठरले आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य एस. वाय. होनगेकर यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शेजारी डी. आर. मोरे, विलास नांदवडेकर, व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title:  Enhance capacity through education - Devanand Shinde: Shivaji University scholarship gravitation program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.