सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाचा आनंद लुटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:09+5:302021-03-10T04:26:09+5:30

येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी राज्य कनिष्ठ अभियंता संघटना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ...

Enjoy life with a positive outlook | सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाचा आनंद लुटा

सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाचा आनंद लुटा

googlenewsNext

येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी राज्य कनिष्ठ अभियंता संघटना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘महिलांच्या समस्या’ या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. बांधकाम भवनमधील सभागृहातील या कार्यक्रमाच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आणि मीना शेषू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. महिला अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये धाडस आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहावे. स्वतंत्रपणे आपल्या अधिकारांचा वापर करावा, असे आ‌वाहन मीना शेषू यांनी केले. त्यांनी ‘संग्राम’ संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. स्त्रियांनी केवळ नामधारी नको, तर अधिकारधारी व्हावे. शासकीय कार्यालय असो अथवा इतर कोणत्याही ठिकाणी स्त्रियांनी आत्मविश्वासाने आपले अधिकार वापरावेत, असे आवाहन विशेष प्रकल्प विभागाच्या अभियंता पूनम पाटील यांनी केले. स्मिता माने, पूनम माने, हेमा जोशी, रूपाली सांगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, संजय काटकर, तुषार बुरूड, संतोष रोकडे, सुरेंद्र काटकर, संघटनेचे सरचिटणीस उन्मेश मुडबिद्रीकर, अभय हेर्लेकर, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रूपाली साळुंखे, वृषाली महाजन, प्रतिमा घोलकर, आदींचे सहकार्य लाभले.

फोटो (०९०३२०२१-कोल-मीना शेषू (महिला दिन) : कोल्हापुरात सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रात ‘संग्राम’ संस्थेच्या सचिव मीना शेषू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी डावीकडून संभाजी माने, संजय काटकर उपस्थित होते.

Web Title: Enjoy life with a positive outlook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.