संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:04+5:302021-07-07T04:31:04+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास दिलेल्या परवानगीचे आम्ही स्वागत करतो. याच धर्तीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू ...

The entire Kolhapur district should be allowed to start trade | संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास दिलेल्या परवानगीचे आम्ही स्वागत करतो. याच धर्तीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली. त्यांनी मंगळवारी मुंबई येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले.

राज्याच्या व्यापारात जिल्ह्याचा वाटा टिकून ठेवण्यासाठी कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत स्तरावरील व्यापारही सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी ललित गांधी यांनी केली. त्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींच्यासमवेत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरात लवकर हा व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळवून देऊ, असे सांगितले.

‘महाराष्ट्र चेंबर’च्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘महाराष्ट्र चेंबर’चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य संदीप भंडारी, डी. सी. सोळंकी उपस्थित होते.

फोटो (०६०७२०२१-कोल-पालकमंत्री निवेदन):

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिले. यावेळी शेजारी संदीप भंडारी उपस्थित होते.

060721\06kol_3_06072021_5.jpg

फोटो (०६०७२०२१-कोल-पालकमंत्री निवेदन): संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिले. यावेळी शेजारी संदीप भंडारी उपस्थित होते.

Web Title: The entire Kolhapur district should be allowed to start trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.