CoronaVirus Kolhapur updates : जिल्ह्यात आज रात्रीपासूनच प्रवेशबंदी, एक किलोमीटर अंतराबाहेर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 08:33 PM2021-04-22T20:33:55+5:302021-04-22T20:38:16+5:30

CoronaVirus Kolhapur updates : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरीकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व तालुकाबंदीही करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस गस्त व कारवाईच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी दिली.

Entrance ban in Kolhapur district from tonight, entry ban in the taluka | CoronaVirus Kolhapur updates : जिल्ह्यात आज रात्रीपासूनच प्रवेशबंदी, एक किलोमीटर अंतराबाहेर कारवाई

CoronaVirus Kolhapur updates : जिल्ह्यात आज रात्रीपासूनच प्रवेशबंदी, एक किलोमीटर अंतराबाहेर कारवाई

Next
ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यात आज रात्रीपासूनच जिल्हाअंतर्गत शहर, तालुकाबंदीएक किलोमीटर अंतराबाहेर आढळल्यास कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरीकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व तालुकाबंदीही करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस गस्त व कारवाईच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी दिली.

कोरोना संक्रमणाचा तिसरा टप्पा सुरु झाल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे, त्यासाठी ह्यब्रेक द चेनह्ण अतर्गत लॉकडाऊन पुकारला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेला वगळले असले तरीही नागरीकांना जिल्हा प्रवेश बंदी व फिरण्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. पर जिल्ह्यातून येणार्या व जिल्हाबाहेर जाणाऱ्या नागरीकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे.

नागरीकांना तालुक्याबाहेरही फिरता येणार नाही. तालुकास्तरावरही पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय कोल्हापूर व इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष ठेवून तेथील नागरीकांनाही एक किलोमीटर अंतराबाहेर वस्तू खरेदीसाठी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.

तालुका प्रवेशाला बंदी

जिल्ह्यातील एका तालुक्यातून दुसर्या तालुक्यात जाण्यावर प्रतिबंध राहणार आहे. त्यासाठी तालुका तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यावर ग्रामीण व्यक्तीला येण्यासही प्रतिबंध केले आहे. त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

एक किमी अंतराबाहेर कारवाई

नागरीकांना अत्यावश्यक सुविधा ह्या एक किमी अंतरापर्यत उपलब्ध आहेत. त्याच्या कारणांस्तर एखादा व्यक्ती एक किमी अंतराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्या रहीवाशी ठिकाणाची शहानीशी करुन त्याच्यावर वाहन जप्ती, दंड, गुन्हे दाखल व जागीच ॲन्टीजेन चाचणीची कारवाई करण्यात येणार आहे.

आता इव्हिनिंग वॉकवरही कारवाई

पोलीस खात्यामार्फत रोज मॉर्निग वॉक साठी बाहेर पडलेल्यावर कारवाई सुरु आहे. पण आता ह्यइव्हिनिंग वॉकह्ण साठी घराबाहेर बाहेर पडलेल्या सर्वावरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरीकांनी सायंकाळी अगर रात्री उशीराही बाहेर फिरु नये असे आवाहन पोलीस खात्यामार्फत केले आहे.

अंतरजिल्हा नाकाबंदीची ठिकाणे

कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदीच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका, कोगनोळी टोल नाका तसेच सांगली रोडवरील अंकली पूल, आंबा (ता. शाहूवाडी), शिनोळी (ता. चंदगड), राधानगरी, गवसे (आजरा) या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असतील. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्ताची विभागणी केली आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष

कोल्हापूर शहरात नऊ तर इचलकरंजी शहरात सहा ठिकाणी कायम पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे. त्याशिवाय बाजारपेठा, भाजी मार्केटच्या बाहेर पोलीसांची तपासणी पथके ठेवण्यात येत आहे. येथे वस्तू खरेदीसाठी येणारा एक किमी अंतरापेक्षा जादा दूरवरुन आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Entrance ban in Kolhapur district from tonight, entry ban in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.