समान हप्त्यात वीज बिल भरण्याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:30+5:302020-12-25T04:20:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनामुळे बंद काळातील वीज बिल समान हप्त्यात भरून घेण्यासाठी महावितरणने मान्यता दिली आहे. त्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनामुळे बंद काळातील वीज बिल समान हप्त्यात भरून घेण्यासाठी महावितरणने मान्यता दिली आहे. त्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली असून, उद्योजकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये यंत्रमाग व्यवसाय ६० दिवस पूर्णत: ठप्प होता. त्यानंतर सुरळीत होण्यास सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे कापड व सूत खरेदी - विक्री व्यवहारातील पेमेंट मिळण्यास विलंब होणार होता. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने महावितरणकडे वीज बिल भरण्यासाठी मुदत व समान हप्ते करून देण्याची मागणी केली होती. त्याला मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात उद्योजकांना अडचणी असल्यास पॉवरलूम असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.