महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:03 PM2020-02-03T13:03:43+5:302020-02-03T13:04:53+5:30
महावितरणने यंदापासून वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता परिमंडलस्तरावर वर्षातून दोनवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलाने आपला पहिलाच कार्यक्रम मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा केला.
दररोजच्या कामातून येणारे ताण-तणाव कमी करण्यासाठी महावितरणकोल्हापूर परिमंडलाने 31 जानेवारी रोजी सायंकाळी ह्यऊर्जा झ्र 2020ह्ण हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास वीज कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने वीज कर्मचाऱ्यांचा नुसता ताण-तणावच दूर केला नाही तर त्यांना नवी ऊर्जा सुद्धा दिली.
महावितरणने यंदापासून वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता परिमंडलस्तरावर वर्षातून दोनवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलाने आपला पहिलाच कार्यक्रम मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा केला. त्यासाठी ताराबाई पार्कातील ह्यविद्युत भवनह्णला रंगरंगोटी करुन त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत भवन परिसरातील पार्किंगच्या खुल्या जागेत आयोजित केल्याने कर्मचाऱ्यांनी गुलाबी थंडीत संगीताची मेजवानी लुटली.
यासाठी सांगली येथील ह्यव्हर्साटाईल इव्हेंटह्ण या ऑर्केस्ट्रासह स्टॅण्ड-अप् कॉमेडी फेम अजितकुमार कोष्टी ऊर्फ ह्यगण्याह्णला निमंत्रित केले होते. गण्याने केलेल्या विनोदांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तर ऑर्केस्ट्रा कलाकारांनी एकाहून एक सरस गाणी सादर करुन वातावरण प्रफुल्लित ठेवले. त्यांच्या गाण्यांवर चिमुकल्यांसह कर्मचाऱ्यांनीही नृत्यसाज चढवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले यांनी केले. यावेळी मंचावर कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे, सांगलीचे प्रभारी अभियंता श्री. पराग बापट, सहा. महाव्यवस्थापक श्री. सुनील पाटील, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र देसाई व समन्वयक तथा उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भूपेंद्र वाघमारे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सुमारे दीड हजारांहून अधिक वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी त्यांच्या कुटुंबासह सहभागी झाले होते. चहा, नाष्ता व जेवणासह बालगोपालांसाठी खेळण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शकील महात यांनी केले.