corona virus-भाविकांच्या हाताला स्टेरलियम द्रव लावूनच अंबाबाई मंदिरात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 03:28 PM2020-03-10T15:28:35+5:302020-03-10T15:30:31+5:30
चीननंतर भारतातही आलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हाताला स्टेरलियम हे सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.
कोल्हापूर : चीननंतर भारतातही आलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हाताला स्टेरलियम हे सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.
खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हे पाऊल उचलले असून भाविकांना व नागरिकांना या व्हायरसची माहिती व्हावी यासाठी मोठा माहिती फलक लावण्यात आला आहे. शिवाय एक लाख माहितीपत्रक छापण्यात आल्या आहेत.
अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज १५ ते २० हजार भाविक कोल्हापुरात येतात. त्यामुळे मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या प श्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने मंगळवारपासून भाविकांना हॅन्ड सॅनिटायझर लावले जात आहे.
अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाज्यांवर समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या हाताला सॅनियाझर लावल्यानंतर त्यांना आत प्रवेश दिला जात आहे, तर कर्मचाऱ्यांची काळजी वाहत सर्वांना मास्क देण्यात आले आहेत.
परिसरात येणाऱ्या भाविकांना व नागरिकांना या व्हायरसची माहिती व्हावी यासाठी मोठा माहिती फलकही लावण्यात आला आहे. तसेच समितीने १ लाख माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहेत.