मराठा विद्यार्थी वसतिगृहाची जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:37 AM2019-06-25T10:37:21+5:302019-06-25T10:38:57+5:30

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी ...

The entry process of Maratha student hostel in the second week of July | मराठा विद्यार्थी वसतिगृहाची जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया

मराठा विद्यार्थी वसतिगृहाची जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया

Next
ठळक मुद्देमराठा विद्यार्थी वसतिगृहाची जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियाएकूण ७२ जागा; आवश्यक सुविधा उपलब्ध

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्याकाळी वसतिगृहांची उभारणी करून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच विचार डोळ्यांसमोर ठेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह सुरूकरून दुर्बल आणि वंचित घटकाला शिक्षणासाठी शासनाकडून पाठबळ देण्यात आले आहे. या वसतिगृहाची यंदाची प्रवेश प्रकिया जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.

गतवर्षी राज्य शासनाने आर्थिक मागास विशेषत: मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शहराच्या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी, या दृष्टिकोनातून मराठा वसतिगृहे स्थापन करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्याजिल्ह्यांत मराठा वसतिगृहे सुरूकरण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यातूनच राज्यातील पहिले मराठा वसतिगृह कोल्हापुरात स्थापन करण्याच्या शासनाच्या उपक्रमात महसूलमंत्री पाटील यांनी सक्रिय पुढाकार घेऊन मराठा वसतिगृहाची संकल्पना ३ आॅगस्ट २०१८ रोजी सत्यात उतरविली.

कोल्हापुरातील सदर बाजार, विचारेमाळ परिसरातील शाहू कॉलेजशेजारील शासकीय निवासस्थान परिसरात राज्यातील पहिले मराठा वसतिगृह उभे राहिले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची राहण्याची सोय झाली आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या व्यवस्थापनाखाली सद्या कोल्हापुरातील मराठा वसतिगृहे सुरूआहेत. या वसतिगृहात ७२ विद्यार्थी क्षमता आहे.

वसतिगृहात विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी, अभ्यासिका, २४ तास सिक्युरिटी, आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या वसतिगृह इमारतीमध्ये तळमजला पार्किंग करण्यात आले असून, सर्व खोल्यांना आकर्षक फरशा, कपाटे, शौचालय, बाथरूम अशा आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. रेक्टर म्हणून निवृत्त कॅप्टन महादेव यादव कार्यरत आहेत.

लवकरच संस्थेची नियुक्ती

या वसतिगृहात पहिल्या वर्षी ५० विद्यार्थी प्रवेशित होते. यावर्षी विविध शिक्षण संस्था, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या वसतिगृहातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. वसतिगृह चालविण्यासाठी संस्थेची नियुक्ती लवकरच करण्यात येईल. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती वसतिगृहाचे सदस्य सचिव प्रशांत पट्टलवार यांनी सोमवारी दिली.
 

 

Web Title: The entry process of Maratha student hostel in the second week of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.