Kolhapur: राऊतवाडी धबधबा पर्यटनास अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी; स्थानिक प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:28 PM2023-07-20T15:28:04+5:302023-07-20T15:39:17+5:30
धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले
गौरव सांगावकर
राधानगरी : मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधबा पर्यटनासाठी आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पर्यटकांनी धबधब्याकडे येण्यासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याकडे शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात. दोन, तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या प्रवाहातून लहान, मोठे दगड येत असल्याने तसेच पाणी प्रवाह अधिक असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी राधानगरी तहसिल व पोलिसांनी गांभीर्य ओळखून अनिश्चित काळासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे.
धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख, पो. नि. ईश्वर ओमासे यांनी केले आहे.